OTT प्लॅटफॉर्मवर सिनेमे रिलीज केल्यानं फायदा की नुकसान ? होणार ‘हे’ मोठे बदल ! जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाची वाढती प्रकरणं लक्षात घेता अनेक सिनेमांच्या मेकर्सनी त्यांचे सिनेमे ऑनलाईन रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु ही परिस्थिती जर अशीच कायम राहिली आणि सिनेमे ऑनलाईन रिलीज होत राहिले तर कोणते मोठे बदल होतील आणि याचे फायदे किंवा नुकसान काय होईल हे आपण जाणून घेऊयात.

अनुभव

जेव्हा प्रेक्षक थिएटरमध्ये सिनेमा पाहतात तेव्हा त्याचा अनुभव वेगळा असतो. पडद्यावर ते प्रत्येक गोष्ट नीट पाहू शकतात आणि त्याचा आनंद घेऊ शकतात. परंतु डिजिटलवर मात्र ते चार भितींच्या आत तेही मोबाईलवर किंवा लहान स्क्रिनवरच सिनेमा बघणार. यामुळं अनुभवात फरक तर पडणारच ना.

ओटीटीवर कसा निघणार सिनेमाचा खर्च ?

जेव्हा सिनेमा सिनेमा हॉलमध्ये रिलीज होत होता तेव्हा तो अ‍ॅडव्हान्स बुकिंगद्वारे बक्कळ कमाई करत होता. परंतु ओटीटीवर असं होणार नाही. सिनेमाचा खर्च काढणं आणि नफा मिळवणं हे एक आव्हान असणार आहे.

100 कोटी वाला ट्रेंड संपणार

जर एखाद्या सिनेमा 100 कोटींची कमाई केली तर तो सिनेमा बॉलिवूडमध्ये सुपरहिट मानला जातो. सिनेमात किती कमाई केली यावर त्याची लोकप्रियता समजत असते. परंतु सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला तर हा ट्रेंड संपुष्टात येईल. परंतु व्ह्युअरशिपवरून त्याच्या सफलतेचा अंदाज लावला जाऊ शकतो.

पायरसीचा धोका कमी होईल

जर सिनेमा रिलीजच्या आधी लीक झाला तर कमाईत मोठं नुकसान होतं. बॉलिवूडमध्ये आजवर अनेक सिनेमे पायरसीचे शिकार झाले आहेत. जर सिनेमे डिजिटलवर रिलीज झाले तर पायरसीचा धोका राहणार नाही. कारण एकाच वेळी सिनेमा लाखो लोकांपर्यंत पोहोचेल.

स्टार कल्चरवर होणार परिणाम

सिनेमा थिएटरमध्ये सुरू असताना चाहत्यांची एक वेगळीच क्रेज किंवा दीवानगी पाहायला मिळत असते. जसं की, टाळ्या शिट्ट्या, डान्स करणं. थिएटरच्या बाहेर प्रेक्षकांच्या लांबलचक रांगा असतात. अशात सिनेमा डिजिटली रिलीज झाल्यानंतर या सगळ्या गोष्टी गायबच होतील. म्हणजेच या सगळ्याचा स्टार कल्चरवर परिणाम होणार.