Coronavirus : महाराष्ट्रात ‘कोरोना’चे 5 नवीन रूग्ण, रिपोर्ट +Ve, 18 जणांवर उपचार सुरू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात कोरोना व्हायरसने ग्रस्त रुग्णांची संख्या वाढून 5 वर पोहोचली आहे. या रुग्णांच्या तपासणीत ते कोरोना व्हायरसने पॉझिटिव्ह असल्याचे दिसले. सर्व रुग्णांना आयसोलेशन वार्डमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. तर या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या तीन जणांच्या तपासणीसाठी त्यांना मुंबईच्या कस्तुरबा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कोरोनाने बाधित परिसरातून महाराष्ट्रात 591 प्रवासी आले होते. ज्यात 304 लोकांना ताप, सर्दी, खोकला यांचे लक्षण होते. या सर्वांनावर आयसोलेशन वार्डमध्ये उपचार सुरु आहेत. उपचार सुरु असलेल्या लोकांमध्ये 289 लोक निगेटिव्ह आढळले. तर 5 कोरोनाग्रस्त आढळले. माहितीनुसार 304 पैकी 289 लोकांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे, तर 12 लोकांवर अजूनही उपचार सुरु आहेत. याशिवाय 6 लोकांना मुंबईच्या कस्तुरबा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

10 मार्चपर्यंत भारतात कोरोना व्हायरसचे 47 पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले होते. व्हायरसला रोखण्यासाठी सोमवारी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन आणि दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यात बैठक झाली होती. या बैठकीत दिल्लीचे आरोग्यमंत्री तसेच केंद्र आणि दिल्ली सरकारमधील अधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर मंत्री हर्षवर्धन यांनी माध्यमांना सांगितले की, आता परिस्थिती सुधारत आहे कारण आपण चांगली तयारी केलेली आहे. प्रवाशांची स्क्रीनिंग होत आहे. रुग्णांच्या तपासणीसाठी 46 प्रयोगशाळा सुरु करण्यात आल्या आहेत. मास्क फक्त संक्रमित रुग्णांसाठी आवश्यक आहेत. त्यामुळे अफवांवर लक्ष देऊ नका.