Coronavirus : संकटसमयी हिरो बनला बॉलिवूडचा ‘हा’ विलन, ‘एवढ्या’ महिन्यांची सॅलरी स्टाफला अ‍ॅडव्हान्स दिली

पोलीसनामा ऑनलाइन –कोरोना व्हायरसच्या भीतीनं सर्वजण घरात बंद आहेत. 548 जिल्ह्यात पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात कोरोनाची अद्याप 471 प्रकरणं समोर आली आहेत. आतापर्यंत यामुळं 9 लोकांचा मृत्यू झाला आहे. केंद्र सरकारनं आता सर्व राज्यात कोरोनाविरोधात लढाई सुरू केली आहे. बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे आपल्या कर्मचाऱ्यांची पूर्णपणे काळजी घेत आहेत. शध्या ते त्यांच्यासाठी हिरो बनले आहेत.

बॉलिवूडचा अ‍ॅक्शन विलन म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आणि निर्माता प्रकाश राज या काळात आपल्या काम करणाऱ्या लहान मजूर आणि कर्मचाऱ्यांसोबत उभा आहे. प्रकाश राजनं आपल्या प्रॉडक्शन हाऊस आणि सिनेमात काम करणाऱ्या लोकांसाठी खास काम केलं आहे. लोक त्याची खास प्रशंसा करत आहेत. त्यानं स्टाफ आणि फिल्म क्रू मेंबर्सना मे महिन्यांपर्यंतची सॅलरी अ‍ॅडव्हांस दिली आहे.

प्रकाश राजनं आपल्या ऑफिशियल ट्विटर अकाऊंवरून पोस्ट शेअर करत सांगितलं की, “जनता कर्फ्यु…. माझ्या जमाफंडाकडे पहा. माझे फार्म्स, घर, सिनेमा, प्रॉडक्शन आणि खासगी स्टाफ मधील सर्व लोकांना मेपर्यंतची सॅलरी अॅडव्हांस दिली आहे. सोशल डिस्टेंसिंगमुळं माझ्या तीन सिनेमातील रोजच्या कामगारांना कमीत कमी अर्धी सॅलरी देण्यात आली आहे. मी पुढेही त्यांच्यासाठी काही तरी करत राहिल. जे मला शक्य आहे ते सारं काही मी त्यांच्यासाठी करणार आहे.”