Lockdown : ‘कोरोना’च्या लॉकडाऊनमध्ये पोलिस ठरतायेत ‘देवदूत’, हा Video पाहिल्यानंतर एक कडक सॅल्यूट तर बनतोच

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था  –  कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्येही वाढ करण्यात आली आहे. प्रशासनाकडून त्याची कठोरपणे अंबालबजावणी करण्यात येत आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी लोकांना वारंवार घरी राहण्याचं आवाहन केलं जात आहे. या दरम्यान गरिब, बेघर, वृद्ध व्यक्तींच्या मदतील पोलीस आणि अनेक सामाजिक कार्यकर्ते समोर येताना दिसत आहेत. लॉकडाऊनमुळे सर्व वाहनसेवा बंद असल्याने अनेक अडचणी निर्माण होत आहेत.

रुग्णालयात किंवा रुग्णालयातून घऱी जाण्यासाठीही वाहन उपलब्ध होत नाहीयेत. अश्यातच एका वृद्धाचा पाय तुटला असताना त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात पोहोचवणं गरजेचं होतं. मात्र कोणतंही वाहन नसल्याने या वृद्धाला दोन जणांनी मिळून हात गाडीवरून न्यायला सुरुवात केली. काही अंतरानंतर पोलिसांनी हा प्रकार पाहिला. पोलिसांनी या वृद्धाला आपल्या गाडीत बसवून तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

दरम्यान, कोरोना व्हायरसचा वाढता प्रसार पाहता देशभरातील स्थिती नियंत्रित करण्यासाठी 3 मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आले. मध्य प्रदेशातही कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनाचे 1,308 रुग्ण आढळले असून 57 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 65 लोक या आजारातून बरे झाले आहेत. तसेच भारतात 13 हजार 800 हून अधिक लोक संक्रमित असून 452 लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत 1076 नवीन प्रकरण समोर आली आहेत. तर माहितीनुसार आतापर्यंत 1 हजार 767 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.