Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 5,988 ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोना (Coronavirus in Maharashtra) बाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत (New Cases) आज (सोमवार) घट झाल्याचे दिसत आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची (Recover Patient) संख्या देखील आज वाढली आहे. याबरोबरच दैनंदिन मृत्यूची संख्या देखील घडली आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर रुग्णसंख्या कमी होत आहे. मगील काही दिवसांपासून राज्यातील दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या (Coronavirus in Maharashtra) चार हजाराच्या आसपास स्थिरावली आहे. आजही राज्यात 3 हजार 626 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तसेच 5 हजार 988 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

राज्यात आतापर्यंत 63 लाख 755 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) 97.09 टक्के आहे.
तसेच आज दिवसभरात 37 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यंत राज्यात 1 लाख 37 हजार 811 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
त्यामुळे राज्यातील मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.12 टक्के इतका झाला आहे.

सध्या राज्यात 47 हजार 695 रुग्णांवर उपचार सुरु (Active patient) आहेत.
राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 49 लाख 99 हजार 475 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64 लाख 89 हजार 800 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
राज्यात सध्या 3 लाख 03 हजार 169 लोक होम क्वारंटाईन आहेत तर 1,963 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

 

Web Title : Coronavirus in Maharashtra | 5,988 corona free in the last 24 hours in the state, find out other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Health Tips | अकाली मृत्यूचा धोका कमी करायचा असेल तर रोज चाला 7000 पावले – संशोधन

Post Office | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत रोज 417 रुपये गुंतवा, व्हाल करोडपती; जाणून घ्या

Online Search | सावधान ! ऑनलाइन सर्च करताय? ‘बॅड बॉट्समुळे होऊ शकते नुकसान, जाणून घ्या