Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 929 ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यातील कोरोना बाधित (Coronavirus in Maharashtra) रुग्णांच्या संख्येत चढ-उतार पहायला मिळत आहे. मंगळवारी (दि.23) राज्यातील कोरोनाची आकडेवारी (Coronavirus in Maharashtra) हजाराच्या आली आहे. तर काल राज्यात 08 रुग्णांच्या मृत्यूची (Death) नोंद झाली होती. मात्र, आज यामध्ये वाढ झाली आहे. राज्यात बरे (Recover) होण्याचे प्रमाण वाढल्याने अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (active patient) संख्या 9 हजारावर आली आहे. त्यामुळे दिलासा मिळाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 766 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर 929 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

राज्यात आतापर्यंत 64 लाख 77 लाख 379 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) 97.68 टक्के आहे.
तसेच आज दिवसभरात 19 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यंत राज्यात 1 लाख 40 हजार 896 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
त्यामुळे राज्यातील मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.12 टक्के इतका झाला आहे.

 

सध्या राज्यात 09 हजार 493 रुग्णांवर उपचार सुरु (Active patient) आहेत.
राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 48 लाख 44 हजार 896 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 66 लाख 31 हजार 297 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
राज्यात सध्या 85 हजार 335 लोक होम क्वारंटाईन (home quarantine) आहेत तर 1077 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (institutional quarantine) आहेत.

 

Web Title :  Coronavirus in Maharashtra | 929 ‘corona’ free in the last 24 hours in the state, find out other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

DBSKKV Ratnagiri Recruitment 2021 | कृषी क्षेत्रातील उमेदवारांना नोकरीची संधी ! ‘या’ कृषि विद्यापीठात लवकरच भरती; पगार 35,000 रूपयांपर्यंत

Balasaheb Murkute | BJP च्या माजी आमदाराचा MSEB कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न

DGP Sanjay Pandey | UPSC पॅनेलच्या शॉर्टलिस्टमध्ये ‘या’ तीन अधिकाऱ्यांची नावे, DGP संजय पाडे यांचे नावच नाही