DGP Sanjay Pandey | UPSC पॅनेलच्या शॉर्टलिस्टमध्ये ‘या’ तीन अधिकाऱ्यांची नावे, DGP संजय पाडे यांचे नावच नाही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  महाराष्ट्राचे विद्यमान पोलीस महासंचालक संजय पांडे (DGP Sanjay Pandey) यांचे केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) तयार केलेल्या शॉर्टलिस्टमध्ये (Shortlist) नावच नसल्याचे समोर आले आहे. यूपीएससी पॅनेलने (UPSC panel) महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदासाठी तीन IPS अधिकाऱ्यांची यादी तयार केली आहे. यामध्ये संजय पाडे (DGP Sanjay Pandey) यांच्या नावाचा समवेश नाही, जे या पदाचा कार्यभार सध्या सांभाळत आहेत.

 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (ACB) प्रमुख रजनीश सेठ (rajnish seth), डीजी होमगार्ड के. व्यंकटेशम (k venkatesham) आणि मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे
(Mumbai CP Hemant Nagrale) या तीन अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.
याबाबतचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे. या शिफारशीवर कार्यवाही करायची की नाही याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)
हे घेणार असल्याची माहिती सूत्रांनी सांगितली.

 

सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) 2006 च्या पोलीस सुधारणांबाबत दिलेल्या महत्त्वाच्या प्रकाश सिंग (Prakash Singh)
निकालात असे निर्देश दिले होते की राज्याने एका प्रक्रियेद्वारे पोलीस महासंचालक नियुक्त करणे आवश्यक आहे.
ज्यामध्ये यूपीएससी समितीने तीन नावांच्या पॅनेलची शिफारस केली आहे, ज्यामधून राज्य एकाची निवड करते.

 

दरम्यान, 1 नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या यूपीएससीच्या बैठकीची माहिती 9 नोव्हेंबर रोजी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे
(Chief Secretary Sitaram Kunte) यांना पाठवण्यात आली होती.
राज्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, शिफारस स्वीकारायची की नाही यावर मुख्यमंत्री अंतीम निर्णय घेतली.
संजय पांडे (DGP Sanjay Pandey) यांनी डीजीपी म्हणून कायम राहावे अशी राज्याच्या सनदी अधिकाऱ्यांच्या एका विभागाची इच्छा आहे.
युपीएससी ही केवळ शिफारस करणारी संस्था आहे. पांडे जून 2022 मध्ये निवृत्त होणार आहेत.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, अशी काही राज्य सरकारे आहेत.
ज्यांनी एकतर अधिकाऱ्यांची नावे पॅनलमेंटसाठी पाठवली नाहीत किंवा यूपीएससी शिफारशीचे पालन केलेले नाही.

डीजी पॅनेलमेंटचा प्रस्ताव मार्चमध्ये यूपीएससीकडे पाठवला होता. त्यानंतर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अधिक माहितीसाठी तो राज्याकडे परत करण्यात आला.
पॅनेलमध्ये समाविष्ट होणाऱ्या अधिकाऱ्यांच्या यादीत आणखी दोन नावे समाविष्ट करण्याचे राज्याला सांगण्यात आले.
राज्याच्या गृह विभागाला सर्व अधिकाऱ्यांचे गोपनीय रेकॉर्ड देण्यास सांगितले होते.

 

तत्कालीन पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयसवाल (subodh kumar jaiswal) हे जानेवारी 2021 मध्ये केंद्रीय प्रतिनियुक्तीवर गेल्यानंतर लगेच हेमंत नगराळे यांच्याकडे डीजीपी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. मात्र यूपीएससीकडे मंजुरीसाठी कोणताही प्रस्ताव पाठवला गेला नाही.
माजी मंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावरील आरोपानंतर परमबीर सिंह (Parambir Singh) यांची आयुक्त पदावरुन उचलबांगडी करण्यात आली.
त्यानंतर नगराळे यांची मुंबई पोलीस आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली त्यानंतर 10 एप्रिल रोजी संजय पांडे यांना कार्यवाहक डीजीपी बनवण्यात आले.
त्यानंतर 18 मार्च रोजी यूपीएससीकडे 1986 ते 1989 बॅचच्या भारतीय पोलीस सेवेतील (IPS) 12 अधिकाऱ्यांच्या नावाचा प्रस्ताव पाठवण्यात आला.

 

Web Title : DGP Sanjay Pandey | dgp sanjay pandeys name not upsc panels shortlist rajnish seth k venkatesham mumbai cp Hemant Nagrale marathi news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

BOB Recruitment 2021 | बँक ऑफ बडौदा करणार ‘या’ पदांसाठी मुंबई, नागपुरात बंपर भरती; जाणून घ्या सविस्तर

Diego Maradona | दिवंगत फुटबॉलपट्टू दिएगो मॅराडोना यांच्यावर क्युबाच्या महिलेकडून अत्यंत गंभीर आरोप

IND Vs NZ Test Series | कानपूरमधील खेळपट्टी खराब, जाणून घ्या कोणी केली तक्रार