Coronavirus : मुंबईतील नालासोपारा येथे 65 वर्षीय रुग्णाचा कोरोनाने मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून मृतांची संख्या देखील वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. मुंबईतील नालासोपारा येथे काल रात्री एका 65 वर्षीय कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णावर खासगी हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु असताना उपचारादरम्यान याचा मृत्यू झाला.

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 781 वर पोहचली आहे. यामध्ये सातत्याने भर पडत आहे. आजच्या दिवसात राज्यात 33 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर देशातील कोरोना बाधितांचा आकडा 4 हजाराच्या वर गेला आहे. मुंबईत कोरोनाने थैमान घातले असून कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता 23 हॉस्पीटलमध्ये विलगीकरणाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्रातील 30 रुग्णालये कोरोनाग्रस्तांसाठी घोषित करण्यात आली असून त्याठिकाणी कोरोनाग्रस्तांवर उपचार केले जाणार आहेत.

मुळे कोरोनाची लक्षण आढळून आल्यास नागरिकांना या ठिकाणी जाऊन तपासणी करता येणार आहे. इतर हॉस्पीटलमध्ये जाणे टाळा. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. रविवारी पुण्यात कोरोना व्हायरसने 3 जणांचा बळी घेतला. त्यापैकी दोन रुग्णांचे वय 52 आणि 60 वर्षे होते. कोरोनामुळे मृत्यू पडलेल्यांमध्ये वृद्ध, जेष्ठ नागरिक अधिक आहेत. तसंच मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारखे आजार असल्यास कोरोना प्रभाव अधिक तीव्र होत असल्याचे आतापर्यंत मृत्यू झालेल्यांवरून दिसून येत आहे.