Coronavirus in Maharashtra | दिलासादयक! राज्यात नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक, गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 15,140 नवे रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील कोरोनाच्या (Coronavirus in Maharashtra) रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे.  कोरोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने सक्रिय रुग्णांची (Active Patient) संख्या कमी झाली आहे. राज्यात गेल्या 24 तासात 15 हजार 140 नवे कोरोनाबाधित रुग्ण (Coronavirus in Maharashtra) आढळले आहेत. तर 39 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज  91 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

 

राज्यात आज 35 हजार 453 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजपर्यंत 73 लाख 67 हजार 259 रुग्णांनी कोरोनावर (Coronavirus in Maharashtra) मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 94.42 टक्के झाले आहे. राज्यात आज 39 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यू दर (Fatality Rate) 1.85 टक्के झाला आहे.

 

 

राज्यात आजपर्यंत 7 कोटी 46 लाख 29 हजार 449 प्रयोगशाळा तपसण्या करण्यात आल्या आहेत.
यामध्ये 77 लाख 21 हजार 109 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. सध्या 2 लाख 07 हजार 350 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
राज्यात 11 लाख 74 हजार 825 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये (Home Quarantine) आहेत.
तर 2798 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (Institutional Quarantine) आहेत.

 

Web Title :- Coronavirus in Maharashtra | corona 15,140 new patients in state in last 24 hours find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | पुण्यातील एच. पी ज्वेलर्समध्ये दागिन्यांवर डल्ला मारणारी महिला गजाआड

 

Pune Crime | गांजा विक्री करताना सराईत गुन्हेगाराला अटक, मार्केटयार्ड पोलिसांची कारवाई

 

Pimpri Corona Updates | दिलासादायक ! पिंपरी चिंचवडमध्ये रुग्णांच्या संख्येत मोठी घट, गेल्या 24 तासात 2942 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी