Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 35,756 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा संसर्ग (Coronavirus in Maharashtra) मागील काही दिवसांपासून वेगाने वाढला असला तरी आता नवीन रुग्णांच्या संख्येत थोडी घट झाली आहे. राज्यात गेल्या 24 तासात 35 हजार 756 नवे कोरोनाबाधित (Coronavirus in Maharashtra) रुग्ण आढळले आहेत. तर 79 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

राज्यात आज 39 हजार 857 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजपर्यंत 71 लाख 60 हजार 293 रुग्णांनी कोरोनावर (Coronavirus in Maharashtra) मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 94.15 टक्के झाले आहे. राज्यात आज 79 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत राज्यात 1 लाख 42 हजार 316 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यू दर (Fatality Rate) 1.87 टक्के झाला आहे.

 

राज्यात आजपर्यंत 7 कोटी 38 लाख 67 हजार 385 प्रयोगशाळा तपसण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये 76 लाख 05 हजार 181 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 10.27 टक्के आहे. सध्या 2 लाख 98 हजार 733 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात 15 लाख 47 हजार 643 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये (Home Quarantine) आहेत. तर 3298 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (Institutional Quarantine) आहेत.

 

Web Title :- Coronavirus in Maharashtra | corona 35,756 new patients in state in last 24 hours find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Deepika Padukone Viral Video | दीपिका पादुकोणनं बिना पॅन्टचा शेअर केला बोल्ड व्हिडिओ, अदा पाहून सोशल मीडियाचं वाढलं तापमान

 

Post Office IVR Service | जर तुमचे पोस्ट ऑफिसमध्ये असेल एखादे अकाऊंट, तर ‘हा’ नंबर तुमच्या मोबाइलमध्ये आवश्यक करा सेव्ह; जाणून घ्या

 

Mumbai Police Crime Branch | मुंबई पोलिसांची मोठी कारवाई ! तब्बल 7 कोटींच्या बनावट नोटा जप्त, रॅकेटचा पदार्फाश