Coronavirus in Maharashtra | दिलासादायक! राज्यात गेल्या 24 तासात 50,142 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा संसर्ग (Coronavirus in Maharashtra) मागील काही दिवसांपासून कमी होत आहे. रुग्ण संख्या कमी झाली असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने दिलासा मिळाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 27 हजार 971 नवे कोरोनाबाधित (Coronavirus in Maharashtra) रुग्ण आढळले आहेत. तर 61 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

राज्यात आज 50 हजार 142 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजपर्यंत 72 लाख 92 हजार 791 रुग्णांनी कोरोनावर (Coronavirus in Maharashtra) मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 94.91 टक्के झाले आहे. राज्यात आज 61 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत राज्यात 1 लाख 42 हजार 522 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यू दर (Fatality Rate) 1.85 टक्के झाला आहे.

 

राज्यात आजपर्यंत 7 कोटी 43 लाख 33 हजार 720 प्रयोगशाळा तपसण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये 76 लाख 83 हजार 525 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. सध्या 2 लाख 44 हजार 344 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात 11 लाख 49 हजार 182 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये (Home Quarantine) आहेत. तर 3375 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (Institutional Quarantine) आहेत.

 

Web Title :- coronavirus in maharashtra | corona 50,142 patients discharge in state in last 24 hours find out other-statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

PM Kisan Scheme | 63 लाख शेतकर्‍यांसाठी मोठी खुशखबर! आता मोदी सरकार देईल पूर्ण 16,000 रुपये, जाणून घ्या काय आहे प्लान?

 

Pune Police | पुण्यातील पोलिस उपनिरीक्षक तडकाफडकी निलंबीत

 

Bombay High Court | 7 वर्षाच्या प्रत्यक्ष साक्षीदाराची साक्ष ग्राह्य धरता येणार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्वाळा