Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 906 नवीन रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना (Coronavirus in Maharashtra) बाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट होत असल्याचे पहायला मिळत आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची (Recover Patient) संख्या देखील वाढली आहे. याबरोबरच दैनंदिन मृत्यूची संख्या देखील घटली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील दैनंदिन कोरोना (Coronavirus in Maharashtra) रुग्णांची संख्या हजाराच्या आत आली आहे. आजही राज्यात 906 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तसेच 918 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

 

 

 

राज्यात आतापर्यंत 64 लाख 72 हजार 681 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) 97.65 टक्के झाले आहे. तसेच आज दिवसभरात 15 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत राज्यात 1 लाख 40 हजार 707 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.12 टक्के इतका झाला आहे.

 

सध्या राज्यात 11 हजार 704 रुग्णांवर उपचार सुरु (Active patient) आहेत.
राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 44 लाख 89 हजार 471 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 66 लाख 28 हजार 744 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
राज्यात सध्या 99 हजार 369 लोक होम क्वारंटाईन (home quarantine) आहेत
तर 1009 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (institutional quarantine) आहेत.

 

Web Title :- Coronavirus in Maharashtra | Diagnosis of 906 new patients of Corona in the last 24 hours in the state, find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा