Coronavirus in Maharashtra | राज्यात ‘कोरोना’च्या 2 हजाराहून अधिक रुग्णांना डिस्चार्ज, गेल्या 24 तासात 833 नवे रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याला आज कोरोनावर (Coronavirus in Maharashtra) नियंत्रण मिळवण्याच्या दृष्टीने मोठा दिलासा मिळाला आहे. आज (शनिवार) दैनंदिन कोरोना रुग्णांची (Coronavirus in Maharashtra) संख्या हजाराच्या खाली घसरली आहे. तसेच बरे होणाऱ्या रुग्णांमध्येही वाढ झाली असून आज दैनंदिन मृत्यूसंख्या देखील कमी झाल्याने आशादायक चित्र आहे. तसेच राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची (active patients) संख्या 10 हजारांवर आली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात 833 नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. तर 2,271 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

 

राज्यात आतापर्यंत 64 लाख 74 हजार 952 रुग्णांनी कोरोनावर (Coronavirus in Maharashtra) मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) 97.67 टक्के झाले आहे. तसेच आज दिवसभरात 15 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत राज्यात 1 लाख 40 हजार 722 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.12 टक्के इतका झाला आहे.

 

 

सध्या राज्यात 10 हजार 249 रुग्णांवर उपचार सुरु (Active patient) आहेत.
राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 45 लाख 94 हजार 210 प्रयोगशाळा
नमुन्यांपैकी 66 लाख 29 हजार 577 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
राज्यात सध्या 97 हजार 693 लोक होम क्वारंटाईन (home quarantine) आहेत
तर 1002 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (institutional quarantine) आहेत.

 

Web Title :- Coronavirus in Maharashtra | More than 2,000 corona patients discharged in the state, 833 new patients in last 24 hours, find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा