
Coronavirus in Maharashtra | मोठा दिलासा! राज्यात दैनंदिन रुग्णसंख्या पाचशेच्या आत, जाणून घ्या इतर आकडेवारी
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्येत (Coronavirus in Maharashtra) मोठी घट पहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्या कमी होत आहे. रुग्ण संख्या कमी झाल्याने राज्यातील सक्रिय रुग्णांची (Active Patient) संख्या कमी झाली आहे. राज्याच्या आरोग्यमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत राज्यात 362 नव्या रुग्णांची (Coronavirus in Maharashtra) नोंद झाली आहे. तर 3 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
राज्यात आज 688 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून आजपर्यंत 77 लाख 17 हजार 362 रुग्णांनी कोरोनावर (Coronavirus in Maharashtra) मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.08 टक्के झाले आहे. राज्यात आज 3 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात आजपर्यंत 1 लाख 43 हजार 740 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यू दर (Fatality Rate) 1.82 टक्के झाला आहे.
#Maharashtra #COVID19 Updates for today
*⃣New Cases – 362
*⃣Recoveries – 688
*⃣Deaths – 3
*⃣Active Cases – 3,709
*⃣Total Cases till date – 78,68,813
*⃣Total Recoveries till date – 77,17,362
*⃣Total Deaths till date – 1,43,740
*⃣Tests till date – 7,82,81,255(1/5)🧵
— PIB in Maharashtra 🇮🇳 (@PIBMumbai) March 6, 2022
राज्यात आजपर्यंत 7 कोटी 82 लाख 81 हजार 255 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहेत.
यामध्ये 78 लाख 68 हजार 813 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. सध्या 3 हजार 709 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
राज्यात 26 हजार 291 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये (Home Quarantine) आहेत.
तर 587 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (Institutional Quarantine) आहेत.
Web Title :- Coronavirus in Maharashtra | The daily number of patients in the state is less than five hundred, know other statistics
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update