Coroanvirus : चिंताजनक ! पुण्यात एका दिवसात ‘कोरोना’चे रेकॉर्ड 823 पॉझिटिव्ह रूग्ण, बाधितांचा आकडा 15 हजार पार

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोना व्हायरस साथीशी भारतासह जगभरातील अनेक देश संघर्ष करीत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या 4 लाखांच्या पुढे गेली आहे. आतापर्यंत एकूण 4,10,461 लोक या साथीमुळे त्रस्त असून आतापर्यंत 13,254 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर देशात 1,69,451 सक्रिय प्रकरणे आहेत. यात दिलासादायक बाब म्हणजे 2,27,756 लोकांनी या आजारावर मात केली आहे. तर जगभरात कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 89 लाखांवर गेली आहे. तसेच 4 लाख 66 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. जाणून घेऊया देशभरातील कोविड -19 अपडेट…

– पुण्यात एका दिवसात विक्रमी 823 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यासह संक्रमितांचा आकडा 15,004 वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत 584 लोक मरण पावले आहेत.
– उत्तर प्रदेशात कोरोना व्हायरसचा प्रसार वाढत आहे. शनिवारी एका दिवसात 592 संक्रमितांची नोंद झाली आहे. यात हापूडमध्ये सर्वाधिक 65 नवीन रुग्ण आढळले. अशा प्रकारे, गेल्या 24 तासांत एकूण रुग्णांची संख्या 17,194 वर पोहोचली आहे. तसेच राज्यात करोनामुळे आतापर्यंत 529 लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात 374 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 10,369 रूग्ण संसर्गमुक्त झाले आहेत. माहितीनुसार आता 6237 सक्रिय प्रकरणे आहेत.
– दिल्लीत पुन्हा एकदा कोरोना विषाणूची रेकॉर्ड ब्रेक नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत दिल्लीत 3,630 लोक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. तसेच एका दिवसात 77 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांचा आकडा 2,112 वर पोहोचला आहे. दिल्लीत या व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 56,746 वर पोहोचली आहे.
– ओडिसामध्ये शनिवारी पुरी जिल्ह्यात कोविड -19 मुळे 60 वर्षीय वयस्कर व्यक्तीचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 12 वर पोहोचला आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, संबंधित व्यक्ती आधीच श्वसन रोगाने ग्रस्त होता. ओडिसा मध्ये शनिवारी 179 नवीन रुग्णांची नोंद झाली असून आता संसर्ग झालेल्यांची संख्या 4,856 वर पोहोचली आहे.