Coronavirus : कोलवडीतील ‘कोरोना’ नियंत्रणात

थेऊर पोलिसनामा – कोरोना संक्रमणाचा कोलवडीत कहर चालू असताना केवळ एका आरोग्य सेवकावर जबाबदारी ढकलून मोकळ्या झालेल्या आरोग्य विभागाला पोलिसनामा वेब पोर्टलवर ‘कोरोनाग्रस्त कोलवडीची जबाबदारी एका आरोग्य सेवकावर ‘या मथळ्याखाली झळकलेल्या बातमीनंतर खडबडून जाग आली आणि गावातील कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट आली आहे.

पूर्व हवेलीतील गावामध्ये कोरोनाचा कहर चालू असताना कोलवडीत जवळपास जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत एकही कोरोना रुग्ण नव्हता परंतु त्यानंतर अचानक कोरोनाचा शिरकाव झाला आणि रुग्ण संख्या झपाट्याने वाढत गेली यावर आरोग्य विभागाने अधीक सक्षमपणे लक्ष देणे आवश्यक असताना केवळ एका आरोग्य सेवकावर आणि दोन आशा सेविका यांच्यावर गावाची जबाबदारी टाकून हा विभाग निश्चिंत होता याची माहिती मिळताच पोलिसनामा वेब पोर्टलवर याबाबत बातमी प्रसिद्ध झाली त्यानंतर ही बातमी सर्वत्र व्हायरल झाल्यावर आरोग्य विभाग खडबडून जागा झाला वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकारी डाॅ वर्षा गायकवाड तसेच कम्युनीटी हेल्थ ऑफिसर अनघा शेट्ये यांनी गावभेटी करुन ग्रामस्थांना आरोग्य विषयक सूचना दिल्या तरीही कोलवडीच्या आरोग्य सेविका ख्रिती मात्र आजपर्यंत गावाकडे फिरकल्या नाहीत. सध्या गावात कोरोना रुग्णाची एकुण संख्या 52 असून यापैकी 40 जणांनी कोरोनावर मात करुन आपापल्या घरी परतले आहेत नवीन रुग्ण तुरळक आढळून येत आहेत. संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात असल्याचे समजते.

लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोलवडीत विना मास्क फिरणार्यावर कडक कारवाई केल्यामुळे स्थानिक स्वतःच्या आरोग्य विषयक काळजी घेताना दिसत आहेत.