शाळा सुरु होण्याची तारीख ठरली, राज्य शिक्षण आयुक्तांचा मोठा ‘खुलासा’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना प्रादुर्भाव असल्याने राज्यातील शाळा मागील दोन महिन्यांपासून बंद आहेत. आता बंद असलेल्या शाळांमधील अध्यापन 15 जूनपासून सुरु होणार आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सुरुवातील डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे शिकवले जाणार आहे. ग्रीन झोनमध्ये शाळा भरणार आहेत. शालेय शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष सुरु करण्याची तयारी केली आहे. त्यासाठी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड या शिक्षण सचिव आणि शिक्षण आयुक्त याच्यासोबत सतत चर्चा करत आहे. राज्यातील शाळांचे शैक्षणिक वर्ष 15 जूनपासून सुरु करण्याच्या निर्णयापर्यंत हा विभाग पोहचला आहे. त्यामुळे शाळांचे वर्ग जरी सुरु झाले नाहीत तरी अध्यापन मात्र सुरु केले जाणार आहे.

राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी याबाबत एका मराठी वृत्तपत्राला माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची आहेच शिवाय त्यांच्या शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आम्ही 15 जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरु करत आहोत. यासाठी अध्यापनासाठी विविध पर्यांयांचा विचार करण्यात येत आहे. प्रथम डिजिटल फ्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अध्यापन सुरु होईल. हे अध्यापन टिव्ही, स्थानिक केबल यांच्यासह व्हर्च्युअल क्लासरूम या माध्यमातून शिकवणी सुरु होईल.
डिजिटल फ्लॅटफॉर्मबाबत बोलताना आयुक्त म्हणाले की, शहरामध्ये कोरोनाचा फैलाव अधिक आहे. या भागात वर्ग सुरु करता येणार नाहीत. शहरातील विद्यार्थ्यांचा विचार करता अभ्यासक्रम काही प्रमाणात कमी करण्याचा देखील विचार सुरु आहे. त्यासंबंधी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद आढावा घेत आहे, असे विशाल साळुंखे यांनी सांगितले.

विशाल सोळंकी पुढे म्हणाले, टीव्ही चॅनलबरोबर स्थानिक केबल नेटवर्कच्या माध्यमातून अध्यापनाचे व्हिडिओ विद्यार्थ्यांपर्य़ंत पोचविले जाणार आहेत. शैक्षणिक कामकाज सुरु करण्याबाबत या क्षेत्रातील विविध घटकांशी चर्चा सुरु आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची खबरदारी घेऊन अध्यापन सुरु करण्यात येणार आहेत. तसेच राज्यातील अनेक भागांमध्ये कोरोनाचा फैलाव झालेला नाही. अशा ग्रीन झोनमध्ये शाळा सुरु करण्याचा विचार आह. याबाबत संबंधित जिल्हाधिकारी यांना सूचना दिल्या जाणार आहेत. जर या भागात कोरोनाचा रुग्ण सापडला तर शाला बंद ठेवण्याचा पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले