‘डॅडा ना तिकडे राहतो…’ पोलीस बापाचा 2 वर्षाच्या मुलाशी ‘निशब्द’ करणारा ‘संवाद’

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन केले आहे. लॉकडाऊनमुळे संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा जोमाने कामाला लागली आहे. पोलीस कर्मचारी अहोरात्र मेहनत घेत आहे. न थकता न थांबता त्यांची सेवा सुरु आहे. लोकांनी घरात राहावे, घराबाहेर पडू नये असे पोलिसांकडून वारंवार सांगण्यात येत आहे. नागरिकांना घरी रहा सांगताना मात्र स्वत: कुटुंबाच्या सरक्षेसाठी घरापासून लांब राहणं स्विकारणाऱ्या पोलिसाची एक पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=1429959277209540&id=100005864436554

बीड ग्रामीण पोलीस दलातील पोलीस निरीक्षक सुजित बडे हे सध्या कोरोनाच्या विरोधात आणि नागरिकांना सुरक्षेसाठी काम करत आहेत. नागरिकांनी विनाकारण घरा बाहेर पडू नये तसेच त्यांनी लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करावे यासाठी पोलीस दिवस रात्र गस्त घातल आहेत. मात्र पोलीस निरिक्षक सुजित बडे स्वत: च्या घरापासून कित्येक दिवस लांब आहेत. त्यांना दोन वर्षाचा चिमुकला मुलगा आहे. सकाळी उठल्यावर आपल्या वडिलांना पाहणाऱ्या या काळजाच्या तुकड्याला लॉकडाऊन आणि कोरोनामुळे जवळ घेत येत नसल्याचे दु:ख आहे. पण आपला चिमुकला कोरोना पोहचू नये आणि त्याला आपल्यासोबत बोलता यावं यासठी घरासमोरील गॅलरीत उभं राहून त्याच्यासोबत बोलत असतात.

कुटुंबावरील प्रेम आणि कर्तव्यदक्षता यामुळे दोघांची सांगड घालून त्यांनी सुवर्णमध्य साधत बडे यांनी या पर्याय काढला आहे. दोघंही सोशल डिस्टन्सिंगचं भान राहून समोरासमोरील गॅलरीत उभं राहून बोलतात. त्यांच्या संवादादरम्यानचे हे निशब्द आणि सुन्न करणारे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
मी त्यांच्यापासून वेगळं का राहातो ते त्याला कदाचित आता समजणार नाही पण मी त्याला एकदा गो करोना म्हणायला शिकवलं होतं. तो म्हणतो तेव्हा खूप हसायला येतं हे त्याला समजलं आणि तो मी दिसल्यावर ते म्हणायला लागला.

आमच्या गप्पांदरम्यान कधी फोन आला तर त्याचा चेहरा हिरमूसतो आणि माझा डॅडा तिकडे राहतो असे सांगतो. कदाचित तोही कोरोना जाण्याची खूप वाट पहात असावा. तोही डॅडा सोबत मस्ती करण्याची वाट पहात असेल. पण त्याला मी समोर का राहतो आणि त्यातले धोके कळायला अजून वेळ आहे, असा अनुभव त्यांनी फोटोसह फेसबुकवर शेअर केला आहे.

बडे यांची फेसबुकवर शेअर केलेली ही भावुक पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यांनी नागरिकांना आपल्या चिमुकल्यासोबत घरी रहा सरक्षित रहा असं आवाहन केलं आहे. अत्यावश्यक कामाविना घरा बाहेर पडू नका आणि लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करा असंही पोलीस निरीक्षक सुजित बडे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.