Corona Lockdown : लॉकडाऊनमुळं चक्क नाल्यामधून वाहतेय लाखो लिटर बिअर, कोरोनामुळं ‘हे’ दिवस पाहायला मिळाले

दिल्ली – पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनाच्या सावटाने जगभरात खळबळ माजवली खरी आणि तितक्याच पटीने नुकसान देखील केले. आता बिअरचेच घ्या ना … भारतात लॉकडाऊन मुळे बियर बनवणाऱ्या अनेक कंपन्यांचे नुकसान झाले आहे. अनेक कंपन्यांना आपली बियर हि अक्षरशः फेकून द्यावी लागली आहे . नुकतीच दिल्ली मधील एनसीआर मधील मायक्रोबेव्हरेज कंपनीने १ लाख लिटर ताजी बिअर नाल्यात टाकून दिली. अनेक बिअर कंपन्यांमध्ये बियर या प्रकल्पात म्हणजेच तयार होण्याच्या प्रक्रियेत पडून साठून होत्या , त्या बाटलीबंद करण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे त्यांची खराब होण्याची दाट शक्यता असते आणि विशेष म्हणजे या बिअर ला खराब होण्यापासून वाचवण्याचा खर्च हा बिअर च्या मूळ किमतीपेक्षा कित्येक पटीने जास्त येत असतो त्यामुळेच बिअर कंपन्यांना बिअर या ओतून द्याव्या लागत आहे.

तसेच गुरुग्राम सायबर हब आउटलेटमधून सुद्धा ५ हजार लिटर बियर नाल्यात टाकण्यात आली . , तसेच प्रन्स्टर प्रमोटर या बिअर कंपनीला देखील आपली ३ हजार लिटर बिअर टाकावी लागली. तसेच ब्रुअरीचे सल्लागार ईशान ग्रोहर म्हणाले कि कोरोनामुळे बिअर कंपन्यांवर देशोधडीला लागण्याची वेळ आली आहे. नुकतेच लॉकडाऊन मध्ये बिअर विकण्याच्या प्रस्तावाला देखील नाकारण्यात आले आहे. तसेच लॉकडाऊन नंतर देखील लोक बिअर घेण्यास लगेचच मोठ्या संख्येने फिरकणार नाहीत हे देखील तेवढेच खरे