काय सांगता ! होय, मद्यविक्रीतून सरकारच्या तिजोरीत जमा झाले तब्बल ‘एवढे’ कोटी रूपये, जाणून घ्या

ADV

पोलिसनामा ऑनलाईन – लॉकडाऊनमुळे कर वसुली बंद झाल्यामुळे सरकारच्या तिजोरीवर मोठा भार पडला होता. त्यानंतर राज्य सरकारने मद्याच्या विक्रीस मे महिन्यात परवानगी दिली होती. चार महिन्यात राज्याच्या तिजोरीत थोडे थोडके नव्हे तर 3900 कोटी रुपयांची भर टाकली आहे..

मद्यविक्रीतून तिजोरीत भर पडेल असा युक्तीवाद वाईन शॉप दुकानदारांनी केला होता. अखेर सरकारने 4 मे पासून राज्यात वाईन शॉप सुरु करण्यास परवानगी दिली. परंतु वाईनशॉप मालकांना दुकानात नव्हे तर मद्याची होम डिलिव्हरी देण्यास सांगितले होते. आता मात्र दुकानात जाऊन मद्य विकत घेण्याची परवानगी सरकारने दिली आहे. गेल्या 4 महिन्यांत राज्य सरकारला तब्बल 2362 कोटींचा महसूल मिळाला आहे. एकूण 3900 कोटींची मद्य विक्री झाली आहे. सरकारच्या तिजोरीत 682 कोटी देशी दारूपासून, 1568 कोटी विदेशी मद्यापासून आणि 111 कोटी बियर विक्रीतून कररुपाने जमा झाले आहेत. दारूवरच्या अबकारी शुल्कातून राज्याला दिवसाला जवळपास 50 कोटी आणि महिन्याला साधारणतः 1500 कोटी रुपये मिळतात. एप्रिल ते जुलै 2020 या चार महिन्यात 3384 कोटी कररुपाने मिळाले होते. राज्यात 15 हजार रेस्टॉरन्ट अँन्ड बार असून 1685 वाईन शॉप आहेत. 5 हजार बियर शॉप आणि 4045 देशी दारुची दुकाने आहेत. राज्य सरकारने आता फक्त वाईन शॉपलाच परवानगी दिलेली आहे. मद्यविक्रीची सर्व दुकाने सुरु झाल्यास सरकारला महिन्याला 1500 कोटींचे उत्पन्न मिळणे सुरु होणार आहे.