Coronavirus Lockdown : 21 दिवसांसाठी लोक झाले ‘ट्रॅप्ड’, ‘या’ 5 सिनेमात दाखवलीय अशीच ‘कहाणी’

पोलीसनामा ऑनलाईन : कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यापासून मंगळवार(दि 24 मार्च 2020) पासून देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. आता 21 दिवस लोक घरातच बंद राहणार आहेत. प्रश्न असा आहे की, 21 दिवस घरात, सर्व्हाईव कसं केलं जाईल. याचं उत्तर सिनेमांमध्ये लपलं आहे. अशा स्थितीवर अनेक हिंदी आणि परेदशी सिनेमे तयार करण्यात आले आहेत. अशाच काही सिनेमांद्दल आपण जाणून घेणार आहोत.

1) ट्रॅप्ड- 2016 मध्ये आलेल्या विक्रमादित्य मोटवानीच्या या सिनेमात राजकुमार राव प्रमुख भूमिकेत होता. राजकुमार एका खोलीत फसून राहतो तेव्हा काय होतं अशी सगळी ही स्टोरी आहे. त्याच्या बिल्डिंगमध्येही कोणीच नसतं. तो शाकाहारी असून त्याला मुंग्या आणि किडे खावे लागतात. हा सिनेमा अॅमेझॉन प्राईमवर उपलब्ध आहे.

2) हाऊस अरेस्ट- 2019 साली नेटफ्लिक्सवर हा सिनेमा आला होता. या सिनेमात श्रेया पिळगावकर आणि अली फजल प्रमुख भूमिकेत होते. अली फजल स्वत:ला घरात आयसोलेट करतो. हाही सिनेमा नेटफ्लिक्सवर आहे.

3) 36 घंटे- 1974 साली आलेल्या 36 घंटे हा सिनेमा तिलक राजनं डायरेक्ट केला होता. राजकुमार राव आणि माला सिन्हा स्टारर या सिनेमात दोन गुंडे जेलमधून फरार होतात आणि पत्रकाराच्या एका कुटुंबाला बंदी बनवतात. 36 कुटुंब सर्व्हाईव करतं आणि परत येतं. अशी  सगळी या सिनेमाची स्टोरी आहे. हा सिनेमा हंगामाच्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.

4) कास्ट अवे- टॉम हॅक्सनं एकाहून एक सर्व्हाईवल सिनेमे केले आहेत. यातील एक सिनेमा आहे कास्ट अवे. हॉलिवूडच्या या सिनेमात दाखवण्यात आलं आहे की, कॅरियर कंपनीच्या अधिकाऱ्याचं प्लेन क्रॅश होतं. तो समुद्राच्या रस्त्यावरून एका आयलंडवर जातो. यावर एक साध जनावरही नसतं. तो तिथे जिवंत राहतो आणि पुन्हा घरी येतो. हा सिनेमा ऑस्करसाठी नॉमिनेट झाला होता. हा  सिनेमाही तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.

5) 127 ऑवर्स-  या सिनेमात असं दाखवण्यात आलं आहे की, एकजण आपल्या मित्रासोबत जंगलात जातो. काहीतरी होतं आणि प्रमुख भूमिकेतला हा माणूस एकटाच जंगलात अडकतो. त्याला त्याचंच युरीन पिऊन जिवंत रहावं लागतं. नंतर तो घरी येतो. हाही सिनेमा ऑस्करसाठी नॉमिनेट झाला होता. हा सिनेमा 2010 साली आला होता.

You might also like