खा. अमोल कोल्हेंनी दिला केंद्र सरकारला ‘सल्ला’, म्हणाले – ‘को एक्झिस्टिंग विथ कोरोना’ची योजना आखा

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश आले नसून बाधित रुग्णांच्या संख्येत अद्यापही वाढ होताना दिसत आहे. त्यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी केंद्र सरकारला ‘को एक्झिस्टिंग विथ कोरोना’ ची योजना आखण्याचा सल्ला दिला आहे. राज्य सरकारने केलेल्या उपाययोजनांची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकासोबत झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये अमोल कोल्हे यांनी ही सूचना केली.

राज्य सरकारकडून कोरोनासाठी केल्या जात असलेल्या उपयायोजनांचा केंद्रीय पथकाने आढावा घेतला. त्यानंतर आमदार, खासदारांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंग करत चर्चा करण्यात आली.अमोल कोल्हे यांनी यावेळी ‘को एक्झिस्टिंग विथ कोरोना’ योजना आखण्याचा सल्ला दिला. ज्याप्रमाणे आपण टीबी, मलेरियासारख्या आजारांसह दैनंदिन आयुष्य जगत आहोत त्याचप्रमाणे ‘को एक्झिस्टिंग विथ कोरोना’ अशी योजना केंद्र सरकारने आखली पाहिजे. लॉकडाउन दीर्घकाळ सुरु ठेवणे, उद्योग, कामगार आणि नोकरदार वर्गाला परवडणार नाही. सोबतच अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसत असल्याचे त्यांनी सांगितले.