धक्कादायक ! महाराष्ट्रातून परतलेल्या आईला घरात घेण्यास मुलांचा नकार

पोलिसनामा ऑनलाईन – जगभरात कोरोना व्हायरसमुळे नात्यांमध्ये दुरावा आला आहे. अशीच एक घटना तेलंगणात घडली असून मुलांनी 80 वर्षीय आईला घरात घेण्यास नकार दिला आहे. तेलंगणाधील करीमनगर परिसरात ही घटना घडली आहे. महिला महाराष्ट्रातून घरी परतली होतीसर्वात जास्त रुग्ण असल्याने मुलाने कोरोना होईल या भीतीने आईला घरातच घेतले नाही.

संबंधित महिला सोलापुरात नातेवाईकांकडे वास्तव्यास होती. लॉकडाउनचे निर्बंध शिथील केल्यानंतर महिला घरी तेलंगणला परतली होती. पण यावेळी तिचा मोठा मुलगा आणि सुनेने त्यांना घरात घेण्यास नकार दिला अशी माहिती करीमनगर महानगरपालिकेचे प्रभाग सदस्य एडला अशोक यांनी दिली आहे. महिलेने मुलाला प्रकृती चांगली असून कोरोनाची लागण झालेली नाही हे समजावण्याचा प्रयत्न केला. पण मुलाने काहीही ऐकून घेण्यास नकार दिला . दुसरीकडे आई महाराष्ट्रातून आली आहे कळताच कोरोनाच्या भीतीपोटी लहान मुलगा घराला कुलूप लावून निघून गेला.अखेर शेजारी आणि अधिकार्‍यांनी मध्यस्थी केल्यानंतर मोठा मुलगा आईला घरात घेण्यास तयार झाला. पालिका अधिकारी महिलेची करोना चाचणी करणार आहेत. जर काही लक्षणे आढळली तर महिलेला क्वारंटाइन केले जाणार आहे.