Coronavirus : ‘मेंटल हेल्थ’ प्रोफेशनलकडून मदतीसाठी महाराष्ट्र सरकारनं जारी केले ‘फ्री’ हेल्पालाइन नंबर, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसची वाढती प्रकरण पाहता लोक मानसिक स्वरुपात चिंतीत झाले आहेत. याची दखल घेत महाराष्ट्र सरकार, बीएमसी आणि एमपावर यांनी एक मोफत हेल्पलाइन नंबर जारी केला आहे. यावर कोणतीही व्यक्ती मेंटल हेल्थ प्रोफेशनलशी संपर्क साधून आपली चिंता दूर करु शकतात आणि त्यासंबंधित माहिती प्राप्त करु शकतात. ही हेल्पलाइन 24 तास सूचना देऊ शकते ज्याचा संपर्क क्रमांक 1800-120-820050, # LetsTalk1on1 आहे.

राज्यात कोरोनाचे 423 प्रकरण समोर आली आहेत तर मृतांचा आकडा 21 झाला आहे, मुंबईत सर्वाधिक कोरोनाग्रस्त आढळले आहेत. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार बुधवारी संध्याकाळी पाच लोकांचा मृत्यू झाला ज्यात एका महिलेचा देखील समावेश आहे. मुंबईतील 4 आणि पुण्यातील 1 असे मिळून आता मृतांची एकूण संख्या 21 झाली आहे.

राज्य सरकारने अपोलो 24×7 सह मिळून एक ऑनलाइन प्रयोग सुरु केला आहे, जी https://covid-19.maharashtra.gov.in/ वर उपलब्ध आहे. जाहिरातीनुसार, त्वरित आरोग्य सेवा आणि इतर संबंधित संपर्काची माहिती देण्यासाठी लिंक उपलब्ध आहे.  डब्ल्यूएचओ आणि भारत सरकार द्वारे जारी दिशानिर्देशानुसार, कोरोनाची काही लक्षण दिसल्यास स्वता संपर्क करुन याची माहिती तुम्ही देऊ शकतात. यात सांगण्यात आले आहे की ऑनलाइन टूलच्या माध्यमातून अधिकारी कोरोना व्हायरस संक्रमित लोकांची माहिती घेणार आहेत.

वेबलिंकच्या माध्यमातून शोधले जाऊ शकतात प्रभावित परिसर –
बृहन्मुंबई महानगरपालिकेने कोविड – 19 प्रभावित परिसरात जीआयएस (GIS) नकाशा गुरुवारी आपल्या वेबसाइटवर जारी केला आहे. त्यांनी सांगितले की नकाशांच्या मदतीने खबरदारी घेतली जाईल. बीएमसी प्रवक्ता म्हणाले, लोक कोरोना व्हायरस प्रभावित परिसराचा शोध घेऊ शकतील आणि वेबलिंक ज्याद्वारे असा परिसर शोधू शकतील.

https://mumgis.mcgm.gov.in/portal/apps/webappviewer/index.html. या लिंकवर तुम्ही या परिसरासंबंधित माहिती मिळवू शकतात.