Coronavirus | राज्यात गेल्या 24 तासात 10,548 ‘कोरोना’मुक्त, 8,418 नवीन रुग्ण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Coronavirus | राज्याला काल मोठा दिलासा मिळाला असताना आज कालच्या तुलनेत रुग्णसंख्येत काहीशी वाढ झाली आहे. तसेच मृत्यूंच्या संख्येतही कालच्या तुलनेत वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात 8 हजार 418 नव्या कोरोना बाधित (Corona-infected patient) रुग्णांचे निदान झाले आहे. तर 10 हजार 548 इतके रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच आज दिवसभरात 171 कोरोना (Coronavirus) बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.02 टक्के इतका झाला आहे.

आतापर्यंत 58 लाख 72 हजार 268 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट (Recovery rate) 96.06 टक्क्यावर गेला आहे. राज्यात आजपर्यंत 1 लाख 23 हजार 531 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात 1 लाख 14 हजार 297 रुग्णांवर उपचार सुरु (Active patient) आहेत. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4 कोटी 29 लाख 08 हजार 288 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 61 लाख 13 हजार 335 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

पुणे शहरातील (Pune City) कोरोनाची आकडेवारी

– दिवसभरात 268 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 226 रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात कोरोना बाधित 11 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 06.
– 284 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 480150.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 2716.
– एकूण मृत्यू – 8622.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 468812.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 5228.

पिंपरी-चिंचवड (PCMC) शहरातील कोरोनाची आकडेवारी

– दिवसभरात 226 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 329 रुग्णांना डिस्चार्ज.
– शहरात 03 रुग्णांच्या मृत्यूची नोंद. तर 24 तासात एकाही मृत्यूची नोंद नाही
– शहरात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 259380.
– शहरातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 1366.
– एकूण मृत्यू – 4296.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 253718.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी – 4702.

हे देखील वाचा

JEE Mains Exam | JEE Mains परीक्षेच्या तिसऱ्या आणि चौथ्या सत्राच्या परीक्षांच्या तारखा जाहीर, ‘या’ तारखेला होणार परीक्षा

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Coronavirus | Maharashtra reports 8418 new cases, 10,548 recoveries and 171 deaths in the last 24 hours

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update