Coronavirus : पार्टीनंतर गायब झालेल्या कनिकाच्या मित्राचा शोध लागला ! ‘असा’ आहे कोरोना टेस्ट रिपोर्ट

मुंबई : बॉलीवूडनामा ऑनलाइन –सिंगर कनिका कपूर ही पहिली बॉलिवूड सेलिब्रिटी आहे जी कोरोनाची शिकार झाली आहे. सध्या लखनऊमधील पीजीओ हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू आहेत. अलीकडेच माहिती समोर आली आहे की, कनिकाचा एक मित्र जो हॉटेलात आणि पार्टीदरम्यान तिच्या सोबत होता. तो 16 मार्च मापसून गायब होता. पोलिसांकडून त्याचा शोधही सुरू होता. कारण तोही पॉझिटीव असण्याची शक्यता होती. ओजस देसाई असं त्याचं नाव आहे जो बिजनेसमन आहे.

ओजसबद्दल दिलासा देणारी माहिती समोर आली आहे की, ओजसचा शोध लागला आहे. पीटीआयनं दिलेल्या वृत्तानुसार, ओजसचा शोधही लागला आहे आणि त्यानं कोरोना टेस्टही केली आहे. ही टेस्ट निगेटीव आल्याचं समजत आहे. लखनऊमधील पार्टीनंतरच तो त्याच्या मुबंईतील घरी क्वारंटाईनमध्ये होता.

कनिका कपूरची टेस्ट दुसऱ्यांदा पॉझिटीव

समोर आलेल्या माहितीनुसार, कनिका कपूरची दुसऱ्यांदा केलेली कोरोना टेस्टही पॉझिटीव आली आहे. कनिकाच्या घरच्यांनी पहिल्या टेस्टबद्दल सवाल उपस्थित केले होते. सध्या कनिकाची स्थिती स्थिर आहे. कनिकाच्या रिपोर्टमध्येही काही चुका होत्या. यानंतर तिची दुसऱ्यांचा टेस्ट करण्यात आली होती. तिचं वय आणि लिंग चुकीचं लिहिलं गेलं होतं. आता पुन्हा एकदा टेस्ट केल्यानंतरही तिची टेस्ट पॉझिटीव आली आहे.