Coronavirus : 5 बडया देशांच्या गुप्तचर यंत्रणांचा गौप्यस्फोट ! ‘कोरोना’वर लस बनवण्यात चीन अडथळे आणतंय

बीजिंग : पोलिसनामा ऑनलाइन – चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेतूनच कोरोनाचा विषाणू बाहेर पडल्याचा दावा अमेरिकेकडून वारंवार होत आहे. तसंच कोरोना विषाणूचा मोठा उद्रेक होऊनही त्याची तीव्रता आणि हा विषाणू किती प्रमाणात घातक आहे, याची माहिती चीनने दडवून ठेवल्यामुळे जगभरात चीनबद्दल प्रचंड प्रमाणात नाराजी आहे. दरम्यान, आता बरेच देश कोरोना वरती लस बनविण्याचा प्रयत्न करत असताना. चीन त्यामध्ये अडथळे आणत असल्याचा दावा पाच देशांच्या गुप्तचर यंत्रणांनी केला आहे. अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या गुप्तचर यंत्रणांनी चीन लस बनविण्यात अडथळे निर्माण करत असल्याचा दावा केलायं.

द सन या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिल आहे. त्यात म्हटले आहे की, या पाच देशातील गुप्तचर यंत्रणांनी स्वतंत्रपणे १५ पानांचा एक अहवाल तयार केला आहे. जगाला कोरोना विषाणूची लस लवकरात लवकर मिळवी, अशी इच्छा चीनची नाही. चीननं अनेक देश आणि स्वतंत्र वैज्ञानिक संस्थांना कोरोनाचे थेट नमुने देण्यास नकार दिलाय. याशिवाय इतर देशातील वैज्ञानिकांना गाऊंड झिरोवर जाण्याची किंवा घटनास्थळाला भेट देण्याची परवानगी नाकारल्याचा दावा सुद्धा डॉसियरच्या च्या माध्यमातून करण्यात आला आहे.

अहवालात काय म्हटलं आहे?

१. चीन हा सातत्याने कोरोनाचा संसर्ग मनुष्यापासून मनुष्यामध्ये परसल्याच नाकारत आलाय. विशेष म्हणजे बराच काळापासून चीनला याची जाणीव असल्याचं ठाम पुरावे सुद्धा समोर आले आहे. तसेच चीननं ही गोष्ट मान्य करण्यासाठी आठवडा घालवला, त्यामुळे युरोप आणि अमेरिकेत कोरोना संसर्गाने हातपाय पसरलेले होते.

२. चीनच्या ज्या पत्रकार किंवा डॉक्टरांनी कोरोना विषाणू संदर्भात माहिती देण्याचा आणि त्याच्या धोक्याविषयी सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते अचानक गायब झाले आहे.

३. चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेत वटवाघुळांमध्ये सापडलेल्या हानिकारक विषाणूंवरती संशोधन सुरु असल्याचे पुरावे मिळाले आहे. या प्रयोगशाळेत संशोधना दरम्यान कोणत्याही संरक्षण उपकरणांचा वापर केला जात नव्हता. त्याचे फोटोसुद्धा समोर आले होते, मात्र आता ते चीननं हटवले आहे.

४. चीनने वुहानमधील प्रयोगशाळा नष्ट केली नाही, तर त्यात काम करणारे लोक गायब केल्यात.

५. जगातील शास्त्रज्ञांना कोरोना विषाणूचे थेट नमुने पाठविण्यास चीन सातत्याने नकार देत असून, त्यामुळे लस विकसित करण्याची गती आणखी मंदावली आहे.

६. चीननं संक्रमणाच्या सुरुवातीच्या काळात काटेकोरपणे आपल्या देशात प्रवास बंदी लागू केली. परंतु इतर देशांना सांगितले की, ही केवळ खबरदारी आहे. प्रत्येकाने तसं करण्याची गरज नाही.

तसंच अहवालामध्ये पुढं म्हटलं आहे की, बीजिंगला डिसेंबरमध्येच विषाणूची पूर्ण माहिती होती. पण ३१ डिसेंबर रोजी अधिकृतपणे माहिती प्रसिद्ध केली गेली. कोरोना मनुष्यातून मनुष्यामध्ये संक्रमित होतो हे सांगण्यास चीनला २० दिवस लागलं. तोपर्यंत केवळ वुहानमध्ये २५ हजार लोकांना कोरोनाची लागण झाली होती. २३ जानेवारी पासून काही लाख लोकांनी वुहानमधून जगातील कित्येक देशामंध्ये प्रवेश केला. त्यांनतर संबंधित देशात कोरोना संसर्गाची प्रकरणं वाढू लागली, असं चीनच्या अधिकृत कागदपत्रांवरून समोर आलं. या व्यतिरिक्त कोरोना संबंधित माहिती देणारे पत्रकार आणि डॉक्टर बेपत्ता होण्याबाबत चीन सरकारने कोणतीच प्रतिक्रिया आजतागायत दिली नाही.