Coronavirus : कोरोनाची तिसरी लाट दुसर्‍या लाटे एवढीच भीषण, जोर 98 दिवस कायम राहील !

नवी दिल्ली : वृत्तसंस्थादेशात थैमान घातलेली कोरोनाची (coronavirus) दुसरी लाट आता ओसरली आहे. त्यानंतर आता तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. कोरोनाची तिसरी लाट दुसऱ्या लाटेइतकीच भीषण असेल अन तिचा जोर 98 दिवस कायम राहील, अशी आकडेवारी एसबीआयच्या अहवालातून समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय अनुभव आणि त्याठिकाणची आकडेवारी लक्षात घेऊन एसबीआयने हा अहवाल तयार केला आहे. तिसऱ्या लाटेची तीव्रता दुसऱ्या लाटेपेक्षा फारशी वेगळी नाही. मात्र व्यवस्थित पूर्वतयारी केल्यास जीवितहानी कमी करता येईल, असे एसबीआयने अहवालात म्हटले आहे.

कोरोनाच्या coronavirus तिसऱ्या लाटेचा कालावधी साधारणत: 98 दिवसाचा राहील असे सांगितले जात आहे. तर दुसरी लाटेची तीव्रता सरासरी 108 दिवसाची होती, अशी आकडेवारी एसबीआयच्या अहवालात आहे. एप्रिल- मे महिन्यात देशात कोरोनाची दुसरी लाट आली. मेच्या पहिल्या आठवड्यात जवळपास दररोज 4 लाख रुग्ण आढळत होते. मे महिन्यात देशात 90 लाखांहून अधिक रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत कोणत्याच देशात एका महिन्यात इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळले नाहीत. गेल्या महिन्यात देशात कोरोनामुळे coronavirus मृत्यू झालेल्यांची संख्या 1.2 लाखाहून अधिक आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात एकूण 1.7 लाख लोकांना आपला जीव गमावावा लागला. मात्र तिसऱ्या लाटेसाठी योग्य ती पूर्वतयारी केल्यास हाच आकडा 40 हजारांपर्यंत आणता येईल. दुसऱ्या लाटेदरम्यान प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णांचे प्रमाण 20 टक्के होते. तिसऱ्या लाटेदरम्यान ते 5 टक्क्यांवर राहिल्यास जीवितहानी टाळता येणार असल्याचे अहवालात नमूद केले आहे. यासाठी आरोग्य सुविधा उभारण्यावर आणि लसीकरण मोहिमेला गतीमान करण्यावर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे.

Also Read This : 

‘पिंपरी- चिंचवडमध्ये अजित पवारांनी विकासकामे करुनही नशिबी पराभवच आला’ – राज ठाकरे

DIG मनु महाराज यांचे ‘फेक’ फेसबूक प्रोफाइल बनवून मुलींशी अश्लील चॅटिंग, झाली अटक

फुफ्फुसांना ‘निरोगी’ ठेवायचंय तर ‘ही’ 5 योगासने करा, कोरोनापासून होईल बचाव, जाणून घ्या

विलायचीचं अधिक सेवन पडू शकतं महागात, ‘या’ आजारांचे होऊ शकता शिकार, जाणून घ्या

दररोज दह्यासोबत गुळाचं सेवन या वेळी करा, Immunity वाढण्यासह होतील ‘हे’ जबरदस्त फायदे, जाणून घ्या

Maharashtra : राजघराण्यातील सदस्याला पैशांसाठी केलं ब्लॅकमेल, एक लाखाची खंडणी घेताना काँग्रेसचा नेता अटकेत