Coronavirus : ‘कोरोना’ संशयितांवर पोलीस व मनपा कर्मचाऱ्यांची नजर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरामध्ये कोरोनाबाधित किंवा संशयित असलेल्यांना 14 दिवस होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. होम क्वारंटाइन करण्यात आलेल्या व्यक्तींवर नजर ठेवण्यात येणार आहे. कोरोनाबाधित आणि संशयितांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये घराच्या बाहेर पडून नये यासाठी त्यांच्यावर प्रतिबंध घालण्यात आले आहे.

कोरोनाबाधित आणि संशयित यांना 14 दिवस होम क्वारंटाइन करण्यात आले असून. अशा रुग्णांनी घराबाहेर पडू नये यासाठी पोलीस आणि मनपा कर्मचाऱ्यामार्फत पाहणी करण्यात येणार आहे. तसेच जे रुग्ण आदेशाचे पालन न करता घराबाहेर पडतील अशांना समज देखील दिली जाणार आहे. पुण्यातील अनेक सोसायट्यांनी याबाबत तक्रार केली असून त्या पार्श्वभूमीवर ही कार्यवाही करण्यात येत आहे.

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त शंतनु गोयल यांनी बैठक घेऊन अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांना कारवाई करण्याबाबतच्या सूचना दिल्या आहे. ज्या भागामध्ये स्टॅम्प केलेले कोणतेही नागरिक रस्त्यावर अथवा सोसायटीमध्ये फिरताना आढळून आल्यास त्याबाबतची माहिती ही त्वरीत टोल फ्री नंबरवर पाठववी असे आवाहन करण्यात आले आहे.