पुण्यात 10 दिवसांच्या कडक लॉकडाऊनचे सकारात्मक परिणाम, असं बदललं शहर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी काही दिवसांपूर्वी शहरात कडक लॉकडाऊन करण्यात आला होता. मात्र, लॉकडाऊन काळात देखील कोरोना रुग्णांमध्ये वेगाने वाढ होत होती. त्यामुळे लॉकडाऊनच्या परिणामकारतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं. मात्र, पुण्यात जुलैमधील 10 दिवसांच्या लॉकडाऊनचे आता सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत.

पुणे शहरात दिवसाला दोन हजार रुग्णसंख्या वाढत होती. ती निम्म्याने कमी झाली आहे. तसेच मृत्यूदरही 2.3 पर्यत घट झाली. खासगी हॉस्पीटलच्या तब्बल 280 बिलांमध्ये अनियमिता आढळून आली असून संबंधित हॉस्पिटलवर चौकशीकरून कारवाई करण्यात येणार आहे. पुण्यात गेल्या चार दिवसांत कोरोना रुग्ण वाढ कमी झाल्याचे दिसून येत असून टेस्टिंगमध्ये कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. तरीही दैनंदिन रुग्णवाढ आणि डिस्चार्जच्या संख्येत सकारात्मक तफावत दिसून येत आहे.

पुण्यातील कोरोना आटोक्यात आला ?
– पुण्यातील रुग्ण बरे होण्याचा दर 70 टक्के
– पुण्यातील मृत्यूदर 4 टक्यावरून 2.3 टक्के
– पुण्यातील रुग्ण वाढीचा दर 24 टक्क्यावरून 18 टक्के
– रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 17 वरुन 30 दिवसावर
– रोजची रुग्णवाढ 2 हजारावरून 1 हजारावर
– पहिल्यांदाच डिस्चार्जची संख्या रुग्णवाढीपेक्षा अधिक
– पुण्यात आतापर्यंत 3 लाख कोरोना चाचण्या
पुण्यात डिस्चार्जसंख्या अचानक वाढण्याला खासगी हॉस्पिटलच्या आकडेवारीचा घोळच कारणीभूत असल्याचे बोललं जात आहे. त्याचीही चौकशी केली जाणार असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासणे यांनी म्हटलं आहे.