Coronavirus tips : ‘कोरोना’ काळात सकाळी ‘या’ 10 चूका टाळा, अन्यथा इम्यून सिस्टम होईल कमजोर, व्हायरसचा होऊ शकतो संसर्ग

पोलिसनामा ऑनलाइन – कोरोना काळात आरोग्य चांगले ठेवणे खुप जरूरी आहे. एक्सपर्टचे म्हणणे आहे की, चुकीच्या आहाराशी संबंधीत सवयींमुळे इम्यूनिटी सिस्टम कमजोर होऊ लागते आणि लोक आजारी पडतात, जे कोरोना काळात एखाद्या धोक्यापेक्षा कमी नाही. आम्ही अशाच चूकांबद्दल सांगणार आहोत, ज्या सकाळी उठल्यानंतर केल्यास शरीर खुप कमजोर होऊ शकते आणि कोरोना काळात या चूका टाळल्या पाहिजेत.

या चूका करू नका

1) मोबाइल
सकाळी झोपेतून उठल्यावर लगेच मोबाइलचा वापर टाळा, यामुळे डोळ्यांवर खुप वाईट परिणाम होतो.

2) चहा पिणे
सकाळी उठल्यावर चहा प्यायल्याने गॅस, अ‍ॅसिडिटी आणि बद्धकोष्ठता सारख्या समस्या वाढू शकतात. यासाठी चहा टाळा.

3) आंघोळ
सकाळी शरीराचे तापमान जास्त असते, त्यामुळे उठल्या-उठल्या आंघोळीला जाऊ नका. उठल्यानंतर 20 ते 25 मिनिटानंतर आंघोळ करा.

4) धूम्रपान
धूम्रपान शरीराला घातक असते. सकाही उठल्या उठल्या सिगारेट पिणे जास्त धोकादायक ठरू शकते.

5) मसालेदार पदार्थ
जास्त मसालेदार पदार्थ सकाळी टाळा. पौष्टिक नाश्ता करा.

6) बिछान्यातून पटकन उठणे
असे केल्याने बीपी लो होऊ शकतो. चक्कर येऊ शकते. हार्ट अटॅकसुद्धा येऊ शकतो. यासाठी सावकाश उठा. बॉडी स्ट्रेच करा. पायांची हालचाल करा. शरीरात ब्लड सप्लाय नॉर्मल होऊ द्या.

7) थंड पाणी पिणे
यामुळे बद्ध कोष्ठता होते. बॉडी डिहाइड्रेट होऊ शकते. सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्या.

8) मीठ खाणे, जास्त जेवण
यामुळे थकवा, लठ्ठपणा, सुस्ती, शुगर आणि बीपी सारख्या समस्या वाढतात. त्यामुळे या गोष्टी टाळा.

9) उन्हात न जाणे
शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता होते. यासाठी सकाळी कोवळे उन अंगावर जरूर घ्या.

10) एक्सरसाइज न करणे
एक्सरसाइज न केल्याने लठ्ठपणा, थकवा, कमी उर्जा, बीपी, डायबिटीजची समस्या होते. यासाठी मॉर्निंग वॉक, जिम किंवा घरीच अर्धा तास एक्सरसाइज करा.