काय सांगता ! होय, ‘कोरोना’मुळं महिला पोलिस उपनिरीक्षक असलेल्या आईनं तब्बल 250 किलोमीटर ठेवलं लेकीला दूर

पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनाच्या धास्तीमुळे बहुूतांशजण गावी परतले आहेत. मात्र, अशाही स्थितील पोलिस, डॉक्टर, पत्रकार मोठ्या हिमतीने काम करीत आहेत. अशातच कोरोनाची भीती आणि ड्युटीवर जाण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक कविता रुपनर यांनी दोन्ही चिमुरड्यांना तब्बल 250 किलोमीटर दूर आजोळी ठेवून कामाला प्राधान्य दिले आहे. त्यांच्या कामगिरीचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.

पोलिसांनी 24 तास काम करावे लागते. लोकांच्या सुरक्षेसाठी त्यांना बाहेर राहणे महत्त्वाचे आहे. पोलीस उपनिरीक्षक कविता यांचा अनुभव ऐकल्यानंतर सगळ्यांच्या डोळ्यांत पाणी येईल. मागील अडीच वर्षांपासून त्या हिंजवडी पोलीस ठाण्यात काम करत आहेत. पुण्यातही कोरोनानं थैमान घातले असून या भीतीने त्यांनी आपल्या दीड वर्षाच्या चिमुकलीला स्वतः पासून वेगळे ठेवले आहे. त्यांनी त्यांच्या मुलीला अडीचशे किलोमीटर दूर आजोळी ठेवले आहे.

आपल्यामुळे मुलीली त्रास होऊ नये म्हणून त्यांनी तिला आजोळी पाठवले आहे. इतकंच नाही तर तिला तिकडे करमावे म्हणून त्यांनी पतीलाही तिच्यासोबत गावी पाठवले आहे. अशात त्या एकट्या पिंपरीमध्ये कामानिमित्त राहत आहेत. कविता यांनी सांगितलं की त्या मुलीला जवळ घेऊ शकत नाहीत म्हणून त्या रोज तिला व्हिडिओ कॉल करतात. देशातल्या या सगळ्या स्थितीमुळे घरचे नोकरी सोड असा सल्ला देत आहे. मात्र, संकटाला सामोरे जाण्याची शपथ घेतल्यामुळे सर्वकाही अनुभवामुळे अंगावर शहारे येत आहेात. त्यामुळे या जीवघेण्या कोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येकाने घरात थांबा आणि सुरक्षित राहा असे आवाहन त्यांनी केले आहे.