पुण्याच्या राजकिय क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या पती-पत्निला कोरोनाची लागण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेदिवस वाढत चालला असून राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाकडून योग्य त्या उपाय योजना केल्या जात आहेत. देशात महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आहे. राज्यात मुंबई आणि पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. पुण्यात पोलिसांना देखील कोरोनाची लागण झाली असून आता यातून लोकप्रतिनिधी देखील सुटलेले नाहीत.

पुणे शहरातील राजकिय क्षेत्रात सक्रिय असलेल्या पती-पत्नीला कोरोनाची लागण झाल्याची माहती प्रशासनकाडून देण्यात आली आहे. यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने लोकप्रतिनिधींकडून नागरिकांना आवाहन किंवा मदत देण्यात येत आहे. यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध प्रशासनाकडून सरु करण्यात आला आहे. तसेच या दोघांची प्रकृती उत्तम असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, आज कोरोनाचे 597 नवे रुग्ण आढळून आले असून गेल्या 24 तासात 32 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 9 हजार 915 झाली असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. आज 205 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्य़ंत महाराष्ट्रात 1593 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.