Coronavirus : पुण्यातील पत्रकाराचा ‘कोरोना’मुळे मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन पुण्यातील पत्रकाराचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे . एका मराठी वृत्तवाहीनीचे पुण्यातील रिपोर्टर पांडुरंग रायकर यांचे कोरोनामुळे बुधवारी पहाटे साडेपाच वाजता निधन झाले. ते 42 वर्षांचे होते. त्यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

त्यांच्या मागे पत्नी,दोन मुले आणि आई- वडील असा परिवार आहे. पोलीसनामा ऑनलाइनच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली !कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. पुणे शहरातील रुग्ण संख्या वाढत असल्याने चिंता वाढली आहे.