Coronavirus : चीनमधील ‘वेट’ मार्केटमुळं जगात फोफावला ‘कोरोना’, ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी केली कारवाईची मागणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी शुक्रवारी डब्ल्यूएचओ आणि संयुक्त राष्ट्राकडे मागणी केली की चीनमध्ये सुरु असलेल्या वेट मार्केटवर कारवाई करण्यात यावी. ते म्हणाले वेट मार्केट एक वास्तविक समस्या आहे, येथूनच कोरोना व्हायरसला सुरुवात झाली.

गुरुवारी दिलेल्या एका मुलाखतीत मॉरिसन यांच्याकडून सांगण्यात आले की, चीन स्थित वेट मार्केटच ते ठिकाण आहे जेथून व्हायरस पसरला होता. ते म्हणाले की हे जगासाठी एक मोठी आव्हान आहे. डब्ल्यूएचओ आणि इतर आंतरराष्ट्रीय संघटनेना याकडे आणखी लक्ष देऊ शकते.

चीन शहर वुहानमध्ये असलेले वेट मार्केट एक असे मार्केट आहे जेथे अजगर, कासव, सरडे, उंदीर, वटवाघुळ पॅंगोलिंग, जंगली मांजर, मगरी अशा जनावरांचे मांस विकत मिळते. येथूनच हा व्हायरस पसरल्याची शक्यता आहे.

एक तथ्य हे देखील आहे की चीनच्या या मार्केटमधून 2002 मध्ये याच बाजारातून सार्स पसरला होता. या सार्समुळे 26 देशांतील 8,000 लोक संक्रमित झाले होते. हे कोरोना व्हायरसचे पहिले आक्रमण होते, यानंतर चीनमध्ये काही दिवसांसाठी हे मार्केट बंद होते, परंतु काही दिवसांनंतर हे मार्केट परत उघडण्यात आले.

काय आहे वेट मार्केट
वेट मार्केटमध्ये जनावरांना उघड्यावर कापले जाते, या जनावरांचे रक्त, मल, थूंकी पाण्याच मिसळते, यात व्हायरस तयार होतात. याच मार्केटमध्ये लोक येतात आणि हे व्हायरस सहज माणसांच्या शरीरात प्रवेश करु शकतात.

चीनमध्ये असा एक कायदा
1988 मध्ये चीन सरकारने वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन कायदा तयार करुन या जनावरांचा फार्मिंगला (शेती) कायदेशीर केले आहे. यानंतर गावागावात वेट मार्केट वाढू लागले.

चीन संपूर्ण जगात वाढवू इच्छीत आहे हे मार्केट
वृत्तानुसार, चीन बेल्ट अ‍ॅण्ड रोडच्या माध्यमातून जंगली जनावरांच्या व्यापाराचा विस्तार करु इच्छित आहे. कोरोना व्हायरस पसरल्यानंतर हा रोख आवश्यक आहे. एकूण मिळून कोरोना व्हायरस सध्या जगभरात पसरलेला आहे परंतु सत्य हे आहे की चीनमध्येच हा व्हायरस सुरुवातीला जास्त पसरला होता, पाहता पाहता हे व्हायरस जगभरात पसरला. आता हे पाहणे आवश्यक आहे की या व्हायरसवर कसे नियंत्रण मिळवता येईल.