Coronavirus : ‘कोरोना’च्या संकटात जनतेला वार्‍यावर सोडून 20 महिलांना घेऊन ‘हा’ राजा जर्मनीला झाला रवाना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरससोबत लढा देत असलेल्या आपल्या जनतेला एकटं सोडून थायलंडचा राजा महा वजिरलोंगकोर्न उर्फ राम दशम हे जर्मनीला गेले आहे. त्यांनी जर्मनीच्या एका आलिशान हॉटेलला आपला गड बनविला आहे. ते त्यांच्यासोबत 20 स्त्रियांना घेऊन गेले आहे जे हॉटेलमध्ये राहणार आहे. याशिवाय त्यांनी अनेक नोकरांनाही आपल्याबरोबर घेतले आहे.

राजा महाने जर्मनीच्या अल्पाइन रिसॉर्टमधील लक्झरी हॉटेलमध्ये आपल्या सेवकांसोबत स्वत: ला वेगळे ठेवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजाने हॉटेल ग्रँड सोन्नेबीचल पूर्णपणे बुक केले आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी जिल्हा परिषदेची विशेष परवानगी घेतली आहे. 2016 मध्ये वडिलांच्या निधनानंतर राजा महा हे सिंहासनावर बसले होते.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, 67 वर्षाच्या राजासोबत जर्मनीच्या अल्पाइन रिसॉर्टमधील लक्झरी हॉटेलमध्ये 20 महिला आणि मोठ्या संख्येने नोकर राहणार आहे. विषाणूचा वाढता परिणाम लक्षात घेता परिसरातील हॉटेल व गेस्ट हाऊस बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

राजाने आपल्या कुटुंबातील 119 लोकांना कोरोना झाल्याच्या संशयामुळे थायलंडला परत पाठविले आहे. दरम्यान, थायलंडमध्ये कोरोना व्हायरसचा धोका असताना राजाने जर्मनीत पलायन केल्याबद्दल देशातील हजारो लोक संतप्त झाले आहेत. त्यामुळे लोक सोशल मीडियावर राजावर टीका करत आहे. थायलंडमध्ये राजावर टीका किंवा अवमान केल्याबद्दल 15 वर्ष तुरूंगवासाची तरतूद आहे. हे माहित असून देखील लोक राजावर आपला राग व्यक्त करत आहे.

साथीच्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे थायलंड देश झगडत आहे आणि अशावेळी राजा महाने थायलंड सोडले आहे. तिथे आतापर्यंत कोरोना संक्रमणाची 1245 प्रकरणे समोर आली आहेत. थायलंडचा राजा फेब्रुवारीपासून आपल्या देशाबाहेर आहे. सिंहासनावर बसण्यापूर्वी त्यांनी आपल्या महिला बॉडीगार्डशी चौथे लग्न केले होते.