दिलासादायक ! ‘कोरोना’चे 11 रूग्ण तंदुरूस्त झाल्याचा दावा करून महिला डॉक्टरनं दिला भारतीयांना ‘हा’ सल्ला

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना विषाणूविरूद्धच्या लढ्यात भारत एक गंभीर टप्प्यावर आहे. भारतात आतापर्यंत संसर्ग झालेल्या संक्रमणाची एकूण संख्या ५१० वर पोहोचली आहे. अनेक शहरे कुलूपबंद आहेत. त्यात पुढील १५ दिवस खूप महत्वाचे आहेत. भारतातील सर्वात पहिले संक्रमण इटलीवरून येणाऱ्या पर्यटकांत दिसले होते, जे राजस्थानची यात्रा करत होते. त्यापैकी १४ जणांना गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले, जेथे डॉ.सुशीला कटारिया यांच्या नेतृत्त्वाखालील एक पथक त्यांच्यावर उपचार करत होते. डॉ. सुशीला कटारिया यांच्या टीमने ११ संक्रमित लोकांना बरे केले आहे. या विषाणूविरूद्धच्या लढ्यात फ्रंट लाईनवर काम करणाऱ्या सुशिला गेल्या दोन आठवड्यांपासून आपल्या कुटूंबाला व्यवस्थित भेटू शकल्या नाहीत. त्यांच्या जास्तीत जास्त वेळ रुग्णालयातच जातो. एका मुलाखतीत डॉ. कटारिया यांनी सांगितले कि, मी फक्त एक प्रतीक बनले आहे. माझ्यासारखे बरेच डॉक्टर आहेत जे या विषाणूविरूद्ध भारत आणि जगातील बऱ्याच देशांत संघर्ष करीत आहेत. ”

त्यांनी सांगितले कि, “चार तारखेला हे रुग्ण माझ्याकडे आले होते. गेल्या वीस दिवसांपासून ते आमच्याबरोबर आहे. एकूण १४ रुग्णांपैकी ११ रुग्ण बरे झाले आहेत. हे एक नवीन आव्हान आहे. या विषाणूंवर कोणताही इलाज किंवा लस नाही. हा आजार नवीन असल्याने त्याचा कोणताही अनुभव नव्हता. आम्ही अलीकडच्या काळात आपण आणि जगातील इतरांनी जमा केलेले अनुभवाने रुग्णांवर उपचार केले. ज्या रूग्णांमध्ये किरकोळ लक्षणे होती. त्यांना मल्टी-व्हिटॅमिन आणि लक्षणांनुसार ट्रीटमेंट दिली. ज्या रुग्णांना श्वास घ्यायला त्रास होत होता किंवा जास्त ताप आहे, त्यांना अँटी-व्हायरल औषधे दिली गेली. दरम्यान , आम्ही आशा करतो की हा साथीचा रोग जगातील इतर देशांप्रमाणे पसरणार नाही. ”

डॉक्टर सुशीला यांच्या देखरेखीखाली दाखल झालेले बहुतेक रूग्णांचे वय ६८ वर्षांपेक्षा जास्त आहे. या सर्व रूग्णांची प्रकृती चिंताजनक होती. डॉक्टर सुशीला वारंवार इटलीमध्ये राहणाऱ्या त्यांच्या कुटुंबियांना आश्वासन देत होत्या, की बरे झाल्यानंतर त्यांचे नातेवाईक आपल्या देशात परत येऊ शकतील.

डॉक्टर सुशीला यांची अपील :
कोरोनाच्या रूग्णांवर उपचार करणार्‍या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी यांनाही संसर्गाचा धोका जास्त असतो. डॉक्टर सुशीला यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या रुग्णालयाने त्यांना संपूर्ण सुरक्षा पुरविली, परंतु देशातील सर्व रुग्णालयांमधील डॉक्टरांना अशा सुविधा पुरविल्या पाहिजेत. आज उपकरणांची कमतरता नाही, परंतु जर संसर्गाची जास्त प्रकरणे असतील तर समस्या उद्भवू शकतात. म्हणजेच इटली चीनसारखी परिस्थिती भारतात निर्माण झाली तर पीईपी उपकरणे आणि एन ९५ चे मास्क पुरवण्यात अडचणी येऊ शकतात.डॉक्टर कटारिया म्हणतात की, जे एन ९५ मास्क घेऊन फिरत आहेत त्यांनी हा मास्क खरेदी करु नये आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी तो मास्क ठेवावा. कारण सर्वसामान्यांना हा मास्क लावण्याची गरज नाही. या विषाणूंविरूद्ध लढण्यासाठी सामाजिक अंतर आणि आयसोलेशन हा सर्वात प्रभावी आहे. आणि यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. स्वच्छतेची काळजी घेणे, घराबाहेर पडू नये, लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करणे ही आपली जबाबदारी आहे, जेणेकरुन हा व्हायरस पसरण्यापासून रोखता येईल .

त्यांनी सांगितले कि, हे पाहून मला फार वाईट वाटले कि. टाळ्या वाजवत काहींनी अक्षरश रॅली देखील काढली. बऱ्याच ठिकाणी लोकांनी एकत्र येऊन शेणात आंघोळ केली. हे अस्वीकार्य आहे. आपल्याला संसर्ग झाला आहे किंवा नाही याचा फरक पडत नाही, आपल्याला सामाजिक अंतर आणि आयसोलेशन याबाबत काळजी घ्यावी लागेल. संक्रमण कोणालाही होऊ शकते. दरम्यान, संक्रमित लोकांच्या कुटुंबियांवर अत्याचार होत आहेत. सोशल मीडियावर त्याच्याबद्दल निरनिराळ्या गोष्टी लिहिल्या जात आहेत. यापेक्षा दुर्दैवी काहीही असू शकत नाही.

दरम्यान, फ्रंट लाइनवर उभे असलेल्या डॉक्टरांनाही कोरोनाच्या लढाईत संसर्ग झाला आहे, बर्‍याच डॉक्टरांचा मृत्यूही झाला आहे. पण डॉक्टर सुशीला घाबरत नाहीत. त्या म्हणाल्या कि, जेव्हा मला कोरोना बाधित लोकांवर उपचार करण्यास सांगण्यात आले, तेव्हाही मला भीती वाटली नाही. हा आमचा व्यवसाय आहे. हा धोका घेणारी मी एकमेव नाही. माझी नर्स, पॅरामेडिकल स्टाफ, वॉर्ड बॉय हे सर्व तितकेच जोखीम घेत आहेत. हा धोका घेऊनच ही लढाई जिंकता येईल. “