रेल्वेमध्ये 8 फुटाच्या परिसरात बसलेल्यांना होऊ शकतो ‘कोरोना’चा संसर्ग : स्टडी

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : ट्रेनमध्ये 2 तासांच्या प्रवासाच्या दरम्यान जर प्रवासी एखाद्या आजारी व्यक्तीच्या 8 फूटांच्या आत बसल्यास त्याला कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. एका अभ्यासात अशी चेतावणी देण्यात आली आहे. अभ्यासानुसार, एका तासाच्या रेल्वे प्रवासात देखील सामाजिक अंतर 3.2 फूट (एक मीटर) पेक्षा जास्त ठेवणे आवश्यक आहे. चीनच्या हायस्पीड ट्रेनला लक्षात घेऊन हा अभ्यास यूकेच्या साउथम्पटन विद्यापीठाच्या वर्ल्डपॉप प्रोजेक्ट अंतर्गत करण्यात आला. 19 डिसेंबर 2019 ते 6 मार्च 2020 या कालावधीतील डेटाचे विश्लेषण केले गेले.

अभ्यासानुसार, एखाद्या आजारी असलेल्या व्यक्तीपासून पाच सीट पुढे किंवा मागे बसलेले लोग किंवा मग आजूबाजूच्या तीन सिटांच्या अंतरावर बसलेल्या लोकांपैकी सरासरी 0.32 टक्के लोक कोरोना संक्रमित होतात. तथापि आजारी व्यक्तीच्या शेजारी बसलेल्यांना संसर्गाची सरासरी आकडेवारी 3.5 टक्के असल्याचे आढळले. हा अभ्यास Clinical Infectious Diseases जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. अभ्यासात असे म्हटले आहे की आजारी व्यक्तीच्या रांगेत बसलेल्या लोकांमध्ये संक्रमणाचे प्रमाण 1.5 टक्के असते.

अभ्यासामध्ये असेही म्हटले आहे की ट्रेनमध्ये प्रवास करणे आणि आजारी व्यक्तीपासूनचे अंतर हे संसर्गाच्या जोखमीशी थेट संबंधित आहे. दरम्यान ब्रिटनमध्ये सार्वजनिक वाहतुकीत प्रवास करणाऱ्यांसाठी फेस कव्हरिंग बंधनकारक केले आहे.