Coronavirus : ‘कोरोना’ग्रस्तांच्या मदतीसाठी 25 कोटी देण्यासाठी अक्षयकुमार करणार ‘हे’ काम, घेतला ‘मोठा’ निर्णय

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनामुळे देशभरात हाहाकार उडाला आहे. त्यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला मदतीचे आवाहन केले आहे. त्यानुसार बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारने तातडीने  25 कोटींच्या मदतीची घोषणा केली. त्यानंतर त्याच्या मदतीवर पत्नीने अक्षयकुमारला प्रश्न विचारत खरेच 25 कोटींची मदत द्यायची का अशी विचारणा केली. अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिने एक ट्विट करुन अक्षयच्या निर्णयानंतर खरेच 25 कोटी द्यायचे का अशी विचारणा केली होती. त्यानंतर अक्षयने माझ्याकडे काहीही नव्हते. आज असलेली गुंतवणूक मोडून ज्यांच्याकडे काहीही नाही त्यांना मदत करणाार असल्याचे पत्नीला सांगतले.

अक्षयने 25 कोटी इतकी मोठी रक्कम देण्याचा निर्णय घेतल्यानंतर अभिनेत्री ट्विंकल खन्ना त्याला एक प्रश्न विचारला होता. त्यानंतर झालेल्या संवादातून पती म्हणून या माणसाचा मला अभिमान आहे. एवढी मोठी रक्कम द्यायची आहे याबद्दल तुला खात्री आहे ना? कारण ती देण्यासाठी आपल्याला गुंतवणूक मोडावी लागेल असे मी त्याला विचारले होते, त्यावर तो म्हणाला, मी जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा माझ्याकडे काहीच नव्हते. आज मी ज्या ठिकाणी आहे त्याचा विचार करता ज्या लोकांकडे काहीही नाही अशांना मदत करण्यापासून मी कसे मागे हटू, असे ट्विट ट्विंकलने केले आहे. कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी संपूर्ण देश एकवटला आहे. अनेक उद्योजक, खेळाडू, कलाकार आर्थिक मदत करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. त्यातच पंतप्रधानांनी आपत्ती व्यवस्थापनाची कक्षा वाढवण्यासाठी नागरिकांच्या सुरक्षेसंबंधी संशोधनासाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले आहे. त्याच ट्विटवर रिप्लाय करत मोदींनी अक्षय कुमारने 25 कोटींच्या मदतीची घोषणा केली आहे.