Corona Virus : कोरोनामुळं डायमंड प्रिन्सेस क्रूझवरील दोघांचा मृत्यू, 7 भारतीयांवर उपचार सुरु

टोकियो : वृत्तसंस्था – जपानच्या किनाऱ्यावर उभ्या असलेल्या डायमंड प्रिन्सेस क्रूझवरील प्रवाशांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. या क्रूझवर काही भारतीय नागरीक देखील आहे. या क्रूझवरील दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर सात भारतीयांवर कोरोनाचा संसर्ग झाला असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. क्रूझवर अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

क्रूझवर असलेल्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आल्यानंतर क्रूझ जपानच्या किनाऱ्यावर थांबवण्यात आले. कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी सर्वांना क्रूझवरच ठेवण्यात आले. मागील एक आठवड्यापासून ही क्रूझ योकोहामा बंदरावर उभी आहे. या क्रूझवरील 79 प्रवाशांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती जपानच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

जहाजावरील कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांची संख्या 621 वर गेली आहे. आज सकाळी जपानमधील माध्यमांनी या क्रूझवरील दोन जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती दिली आहे. या क्रूझवर 3 हजार 711 प्रवासी व कर्मचारी होते. त्यात 137 भारतीय कर्मचारी व सह प्रवसीदेखील होते.

दरम्यान, जहाजावरील ज्या प्रवाशांची वैद्यकीय चाचणी केली आहे. या प्रवाशांचे वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आले आहेत. या प्रवाशांना 14 दिवस वेगळे ठेवल्यानंतर त्यांना त्यांच्या मायदेशात पाठवण्यात येत आहे. आत्तापर्यंत 500 प्रवाशांची सुटका करण्यात आली आहे.