Coronavirus : राष्ट्रपती भवनात ‘कोरोना’चा ‘शिरकाव’, सफाई कर्मचारी बाधित, 100 जणांना केलं ‘क्वारंटाईन’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – जगभरात धुमाकुळ घालत असलेल्या कोरोना विषाणूचा आता राष्ट्रपती भवनातही शिरकाव झाला आहे. येथील एका सफाई कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे राष्ट्रपती भवनात एकच खळबळ उडाली आहे.

या सफाई कर्मचार्‍यामध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आल्याने त्याची चाचणी घेण्यात आली. तेव्हा त्याला कोराणाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर राष्ट्रपती भवनातील त्याच्या संपर्कात आलेल्या सचिव स्तरावरील अधिकार्‍यांपासून कर्मचार्‍यांपर्यंत अशा १०० जणांची तपासणी करण्यात आली आहे.

अधिकार्‍यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे तर, कर्मचार्‍यांना बाहेर क्वारंटाईन केले गेले आहे. सध्या केवळ सफाई कर्मचारी वगळता इतरांच्या टेस्ट निगेटिव्ह आल्या आहेत. मात्र, खबरदारी म्हणून सर्वांना क्वारंटाईन केले गेले आहे.