Lockdown : विद्या बालनही करणार डॉक्टरांना मदत, घेतला ‘हा’ निर्णय

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनापासून देशातील जनतेचे संरक्षण करण्यासाठी पोलीस, डॉक्टर दिवस-रात्र काम करत आहेत. जीवाची पर्वा न करता हे योद्धे केवळ देशातील जनतेसाठी प्राणांची बाजी लावत आहेत. त्यामुळे इतरांची काळजी घेणार्‍या या कर्मचार्‍यांच्या आरोग्याची काळजी घेणेही गरजेचे आहे. त्यामुळे या परिस्थितीचे गांभीर्य राखत अनेकांनी पोलिसांमध्ये मास्क, सॅनिटाझरचे वाटप केले.  अनेकांनी डॉक्टर आणि अन्य कर्मचार्‍यांना पीपीई किट पुरविल्या. आतापर्यंत कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी गरजूंना, कोरोनाग्रस्तांना आणि अत्यावश्यक सेवा पुरविणार्‍यांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. यामध्येच आता अभिनेत्री विद्या बालनही पुढे आली आहे. तिने पीपीई किट पुरविण्याचा निर्णय घेतला आहे.

विविध हिंदी चित्रपटात भूमिका साकारणार्‍या विद्या बालनने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर  केला आहे. डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचार्‍यांसाठी 1 हजार पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट अर्थात पीपीई किट देणार असल्याचे तिने सांगितले आहे. कोरोनाच्या लढ्यासाठी आतापर्यंत  कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटी मदतीसाठी पुढे आले आहेत. या पूर्वी अभिनेता शाहरुख खाननेदेखील 25 हजार पीपीई किट उपलब्ध करुन दिले आहेत. पीपीई किट खरेदी करण्यासाठी त्याने मदतनिधीही दिला आहे. अनेक कलाकारांनी विविध मार्गांनी मदतीचा हात पुढे केला आहे.