चीनी राष्ट्रपतींच्या पत्नीचं WHO सोबत काय आहे कनेक्शन ? अडचणीत येऊ शकते संघटना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणू संदर्भात बर्‍याच देशांनी जागतिक आरोग्य संघटनेवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याच वेळी, एका अहवालात निदर्शनास आले आहे की, डब्ल्यूएचओने आपल्या संकेतस्थळावर गुडविल अँम्बासिटर पेंग लियुआनचा जो परिचय करून दिला आहे, त्यात ती चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची पत्नी असल्याचे नमूद केलेले नाही. दरम्यान, डब्ल्यूएचओने गुडविल अँम्बासिटर अंतर्गत आपल्या संकेतस्थळावर नऊ जणांची नावे लिहिली आहेत. जेव्हा पेंगची या पदावर निवड झाली तेव्हा डब्ल्यूएचओचे तत्कालीन प्रमुख मार्गारेट चानने म्हंटले होते की, पेंग एक जगप्रसिद्ध आवाज आणि एक चांगली मनाची स्त्री आहे. 2011 मध्ये पेंगची पहिल्यांदा निवड झाली होती. नंतर नवीन डब्ल्यूएचओचे प्रमुख, टेड्रोस अ‍ॅडहैनम घेब्रियेसुस यांनी त्यांना पुन्हा नियुक्त केले.

माहितीनुसार ब्रिटनचे खासदार आणि परराष्ट्र व्यवहार समितीचे अध्यक्ष टॉम टी म्हणाले की, गुडविलची व्याख्या वाढविण्यात आली आहे असे दिसते. डब्ल्यूएचओने अशा लोकांना निवडले पाहिजे जे लोकांच्या हक्कांवर प्रत्यक्ष काम करतात, ना हि त्यांचे ज्यांचे काम संशयास्पद वाटते. दरम्यान पेंगने 1987 मध्ये जिनपिंगशी लग्न केले होते. त्यावेळी जिनपिंग चीनच्या झियामेनचे उपमहापौर होते आणि त्यांच्या पहिल्या पत्नीपासून घटस्फोट झाला होता.

पेंग डब्ल्यूएचओच्या संकेतस्थळावर लिहिले गेले आहे कि, ‘संस्थेचे महासंचालक (तेव्हा) मार्गारेट चान प्रसिद्ध चीनी गायिका आणि अभिनेत्री पेंग लियुआन यांना टीबी आणि एचआयव्ही / एड्सच्या गुडविल अँम्बासिटर म्हणून नियुक्त करतात. पेंग हे पीपल्स लिबरेशन आर्मीच्या जनरल पॉलिटिकल डिपार्टमेंटच्या चिनी गाण्याचे व नृत्य गटाच्या प्रमुख आहेत. त्यांच्याकडे सिव्हिल सर्व्हिसमध्ये पहिले आणि सैन्यात मेजर जनरल पद आहे. पेंग आरोग्य, टीबी आणि एचआयव्ही नियंत्रणासाठी जोरदारपणे सल्ला देते. 2006 मध्ये, पेंग यांना चीनमध्ये एचआयव्ही / एड्स प्रतिबंधासाठी आरोग्य दूत मंत्री बनविण्यात आले आणि 2007 मध्ये टीबी नियंत्रण व प्रतिबंधासाठी राष्ट्रीय अँम्बासिटरही बनण्यात आले.

दरम्यान, अमेरिकेसह अनेक देश हे आरोप करीत आहेत की, डब्ल्यूएचओने जगाला कोरोना विषाणूबद्दल वेळेवर इशारा दिला नाही आणि हे चीनच्या कारणास्तव केले गेले. अमेरिका आणि जर्मन गुप्तचर यंत्रणेच्या हवाल्याने असेही अहवाल प्राप्त झाले आहेत की, चिनी अध्यक्षांनी डब्ल्यूएचओच्या प्रमुखांना कोरोनाशी संबंधित माहिती रोखण्यास सांगितले होते. परंतु डब्ल्यूएचओने असे अहवाल नाकारले. आता डब्ल्यूएचओशी पेंगचे कनेक्शन पुन्हा संघटनेवर प्रश्न उपस्थित करू शकते.