Coronavirus : राज्यात पहिल्या महिला पोलिसाचा ‘कोरोना’मुळे दुर्दैवी मृत्यू

ठाणे :  पोलीसनामा ऑनलाइन –   ठाणे पोलीस दलातील 45 वर्षीय पोलीस शिपाई महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृत महिला पोलीस कर्मचारी ठाण्यातील श्रीनगर पोलीस ठाण्यात कर्यरत होत्या. ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सरु असताना त्यांचा गुरुवारी (दि.21) उपचारादरम्यान मृत्यू झाला. गुरुवारी पुण्यात देखील एका पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृत पोलीस कर्मचारी हे पुणे वाहतूक शाखेत कार्यरत होते.

दरम्यान, पार्कसाईट पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या 57 वर्षीय पोलीस हवालदार यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. ते विक्रोळी पूर्व टागोर नगर येथे वास्तव्यास होते. मागील आठ दिवसांपासून सेव्हल हिल्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान बुधवारी त्यांचा मृत्यू झाला.

पोलीस दलात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना त्याला बळी पडणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. नुकतेच मुंबई पोलीस दलातील एका तरुण सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. शाहूनगर पोलीस ठाण्यात ते कार्य़रत होते. या अधिकाऱ्याचे वय केवळ 32 वर्षे होते. मुंबईत कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना कोरोना योद्धे कोरोनाच्या विळख्यात अडकत असल्याने राज्या समोरील चिंता वाढत चालली आहे. आतापर्यंत पोलीस दलातील हजारपेक्षा अधिक पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे.