4000 रुपयाची लाच स्विकारताना महामंडळाचा जिल्हा व्यवस्थापक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

अकोला : पोलिसानामा ऑनलाइन – शैक्षणिक कर्ज मंजुरीची फाईल मुंबई मुख्य कार्यालयात पाठवण्यासाठी सात हजार रुपयांची लाचेची मागणी करून चार हजार रुपयांची लाच स्विकारणाऱ्या मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकासह कंत्राटी कर्मचाऱ्याला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहथ पकडले. ही कारवाई गुरुवारी करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायायालयाने त्यांची रवानगी कारागृहात केली आहे.

मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचा जिल्हा व्यवस्थापक संजय बळीराम पहुरकर आणि शेख सादिक शेख गुलाम (रा. गणेशपूर, ता. खामगाव) असे लाच स्विकारताना अटक करण्यात आलेल्या आणि कारागृहात रवानगी करण्यात आलेल्या लाचखोरांची नावे आहेत. याप्रकरणी १९ वर्षीय विद्यार्थ्याने अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे.

तक्रारदार परतूर येथील विद्यार्थ्याने शैक्षणिक कर्जाची फाईल सादर केली होती. कर्ज मंजुरीसाठी फाईल मुंबई मुख्य कार्यालयात पाठवण्यासाठी जिल्हा व्यवस्थापक संजय पहुरकर याने विद्यार्थ्याकडे सात हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीमध्ये चार हजार रुपये देण्याचे ठरले होते. विद्यार्थ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर पंचासमक्ष पडताळणी केली. पडताळणीमध्ये कंत्राटी कामगारामर्फत लाच स्विकारण्याचे कबुल केले होते. पथकाने सापळा रचून चार हजार रुपयांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांची रवानगी कारगृहात केली.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like