home page top 1

येण्याची वेळ कळवली नसल्यास पाहुण्यांनी लग्‍नाला खुर्ची आणि जेवण घेऊनच यावे, कार्ड व्हायरल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आजकाल लग्न म्हटलं की आपल्याला काही तरी नवीन ऐकण्यात येत असतं. असेच एक लग्नाचे कार्ड समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये लग्न होऊ घातलेल्या दाम्पत्याने असे लिहिले आहे की, जर पाहुणे मंडळींनी लग्नाला येण्याची किंवा न येण्याची माहिती आम्हाला वेळेत दिली नाही तर त्यांनी आपल्यासाठी खुर्ची आणि आपले जेवण सोबत घेऊन यावे. ही बातमी एका सोशल मीडिया यूजरने सर्वप्रथम समाज माध्यमांवर व्हायरल केली होती. त्याने हि बातमी सोशल डिस्कशन वेबसाईट REDDIT वर शेअर केली आहे. त्यानंतर या बातमीचं अनेक लोकांकडून कौतुक केलं जात आहे.

Viral: शादी के कार्ड पर लिखा- अपनी कुर्सी-खाना लेकर आएं, अगर...

लग्नाचे अनोखे कार्ड REDDIT साईट वर व्हायरल –

अशा प्रकारचे अनोखे कार्ड पाठवणाऱ्या दाम्पत्याचे नाव मात्र आणखी समोर आलेले नाहीये. पण या दाम्पत्याने पाहुणे मंडळींना १० सप्टेंबर २०१९ पर्यंत आपण लग्नाला येणार आहात की नाही हे कळवण्यास सांगितले आहे. ज्या वेबसाईटवर लग्नाचे हे कार्ड व्हायरल झाले आहे त्या REDDIT साईट वर काही वेळातच १ हजार पेक्षा जास्त कॉमेंट या कार्डवर पाहायला मिळाल्या आहेत. अनेक लोकांनी या दाम्पत्याच्या अति इमानदारीपणाचे मनापासून कौतुक सुद्धा केले आहे.

Viral: शादी के कार्ड पर लिखा- अपनी कुर्सी-खाना लेकर आएं, अगर...

…तर खुर्ची आणि जेवण सोबत घेऊन यावे लागेल

या दाम्पत्यांने आपल्या लग्नाच्या कार्डवर असे लिहिले होते की, लग्नाचे निमंत्रण आनंदाने स्वीकारत आहेत की, कि खेदाने अस्वीकार करत आहेत हे कळवावे. परंतु, त्यांनी जर १० सप्टेंबर पर्यंत काही सांगितले नाही तर मात्र लग्नाला येताना आपल्यासाठी खुर्ची आणि जेवण सोबत घेऊन यावे असे कार्ड वर लिहिले होते.

Viral: शादी के कार्ड पर लिखा- अपनी कुर्सी-खाना लेकर आएं, अगर...

सोशल मीडिया वापरकर्त्यांच्या भन्नाट कमेंट

यावर एका सोशल मीडिया वापरकर्त्याने असेही लिहिले आहे की, हे तर खूप छान झाले आपण आरामदायक खुर्ची घेऊन जाऊ शकतो आणि आपल्या आवडीचे सँडविच सुद्धा घेऊन जाऊ शकतो. आणखी एकाने असे लिहिले आहे की, आपल्याला गिफ्ट सुद्धा घेऊन जाण्याची गरज नाही पडणार. हा खूप फायद्याचा सौदा आहे.

Loading...
You might also like