मित्राच्या छातीत गोळ्या घालून खुन करणाऱ्याला जन्मठेप

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – चाकण येथे क्षुल्लक कारणास्तव मित्राच्या छातीत गोळी घालून खून करणाऱ्या आरोपीस जन्मठेप व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा राजगुरुनगर येथील जिल्हा न्यायालयाने ठोठावली आहे. आकाश किसन भालेराव (वय २६,रा. म्हाळुंगे, ता. खेड) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. यामध्ये नितीन लक्ष्मण विरणक (वय २५, रा. तळेगाव स्टेशन, ता. मावळ) यांचा खुन झाला होता.

या खटल्याची माहिती अशी, चाकणच्या खराबवाडीमधील हॉटेल अथर्व बिअर बार अँड परमिट रूममध्ये २१जुलै २०१३ रोजी रात्री अकराच्या सुमारास नितीन लक्ष्मण विरणक हे मित्रांसमवेत जेवायला आले होते. सर्व मित्र यावेळी दारू प्यायले. त्यांनी यावेळी हॉटेलमध्ये खूप आरडाओरडा केला. दरम्यान, त्यांचा मित्र आरोपी आकाश किसन भालेराव (वय २६, रा. म्हाळुंगे, ता. खेड) याला जेवायला बोलावले होते. तो तेथे आला. यावेळी नितीन विरणक व आकाश भालेराव यांच्यात बाचाबाची होऊन भांडण झाले.

चिडलेल्या आकाश भालेराव याने नितीन विरणक यांच्या जवळ असलेल्या गावठी कट्ट्यातून छातीत गोळी घातली. गोळी घातल्यानंतर आरोपीने नितीनला काही अंतरावर फरफटत नेले. त्याला तेथेच सोडून आरोपी त्याच्या स्कॉर्पिओमधून तेथून पसार झाला. हा सर्व प्रकार हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला होता.

दरम्यान, या हॉटेलचे मालक यांनी चाकण पोलिसांना फोनवर माहिती दिली. घटनास्थळी चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस यांनी नाकाबंदी करण्याचे पोलीस कंट्रोलरुमला कळविले, आरोपी तळेगावच्या दिशेने गेला असल्याचे सांगण्यात आले. पोलीस कंट्रोल वरून आलेल्या संदेशाची तळेगाव पोलिसांनी दखल घेत नाकाबंदी करून तळेगाव येथे आरोपीला त्याच्या वाहनासह ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता आरोपीकडे गावठी कट्टा व रक्ताने भरलेले कपडे सापडले होते. या खटल्याची राजगुरुनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एन. के. ब्रम्हे यांच्या न्यायालयापुढे सुनावणी झाली.

या खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकील अरुण ढमाले यांनी १२ साक्षीदार तपासले. तळेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक व हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज न्यायालयाने ग्राह्य धरीत आरोपी आकाश किसन भालेराव यांना दोषी ठरविले.

पोटाच्या समस्या कधीच होणार नाहीत, जर सांभाळल्या ‘या’ आठ गोष्टी

ऑफिसमध्ये बसूनही करता येतील व्यायामाचे हे प्रकार

सुंदर आणि ग्लोइंग त्वचा हवीये.. ‘या’ टिप्स वापरून घरी पण घेऊ शकता स्पा

वजन कमी करण्यासाठी खा ‘ही’ फळभाजी