पुणे : मास्क न लावता विनाकारण फिरणार्‍यांना न्यायालयानं सुनावली 3000 रूपये दंडाची शिक्षा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   मास्क न लावता विनाकारण फिरणाऱ्या तिघांना न्यायालयाने 3 हजाराचा दंडाची शिक्षा सुनावली आहे. भोर न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. यापूर्वी बारामती तालुक्यात तिघांना शिक्षा सुनावली होती.

लहू गोविंद तुपे (वय 31, रा. कारी, ता. भोर), संतोष गोपाळ तुपे (वय 36) आणि सूरज बाबुराव पेटकर (वय 29) अशी शिक्षा सुनवलेल्याची नावे आहेत.

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी राज्यात संचारबंदी लागू केली आहे. विनाकारण नागरिकांना बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र तरीही काहीजण बाहेर फिरत आहेत. त्यांच्यावर 188 नुसार कारवाई करण्यात येत आहे.

दरम्यान भोर ते महाड या रस्त्यावर बंदोबस्त सुरू असताना उपविभागीय पोलीस अधीकारी आणासाहेब जाधव आणि पोलीस निरीक्षक राजु मोरे यांना हे तिघे तोंडाला मास्क न लावता विनाकारण फिरत असताना मिळाले. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यानुसार त्यांच्यावर भोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.

राज्यातील ही दुसरी शिक्षा ठरली आहे. शिक्षा झाल्यानंतर औध्ये अडचणी निर्माण होतात. शासकीय कामाला मोठी अडचण ठरू शकते. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू  नये असे आवाहन करण्यात आले आहे.