Coronavirus : चिंताजनक ! राज्य पोलिस दलात आणखी 88 कर्मचार्‍यांना ‘कोरोना’ची लागण तर एकाचा मृत्यू, बाधितांचा आकडा 4 हजार पार

ADV

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा विळखा अधिक वाढत चालला आहे. त्यामुळे नागरिकांनी लॉकडाऊनचे नियम जरी शिथिल केले असले तरीही पुर्वीपेक्षा आता अधिक काळजी घेण्याची गरज आहे. दिवसेंदिवस राज्यात नव्या कोरोनाबाधित रुग्णांसह बळींचा सुद्धा आकडा वाढत चालला आहे. त्यामुळे वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर्स आणि नर्स यांच्याकडून कोरोना बाधित रुग्णांवर अहोरात्र उपचार केले जात आहेत. याच दरम्यान कोविड वॉरिअर्स म्हणून काम करणाऱ्या पोलीस दलातील आणखी 88 जणांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

कोरोना विरोधात देशात सुरु असलेल्या लढ्यातील आघाडीच्या योध्यांपैकी एक असलेले पोलीस देखील कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. मागील 24 तासांत राज्यात 88 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांची संख्या आता 4 हजाराच्या वर गेली आहे.

ADV

राज्यात कोरोनाबाधित पोलिसांची संख्या 4 हजार 48 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत 47 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. महाराष्ट्र पोलीस विभागाकडून ही माहिती मिळाली आहे. एका वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे. या अगोदर काल (शनिवारी) 48 तासांत 140 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याची नोंद झाली होती.

राज्यातील कोरोना संक्रमितांचा आकडा 124331 वर पोहचला असून 5893 जणांचा बळी गेला आहे. त्यापैकी 62773 जणांची प्रकृती सुधारली असून 55651 जणांवर उपचार सरु असल्याची माहिती देण्यात आली आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या संकटामुळे यापूर्वीचे अनेक सण लॉकडाऊनमुळे घरच्या घरी साजरे करावे लागले होते. तर पुढे येणाऱ्या श्रावण महिन्यात अनेक सणांची रेलचेल असते. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घाटकोपर येथील राम कदम यांची दहीहंडी रद्द करण्यात आली आहे. तर गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी गणेश मंडळांना आवाहन केले आहे.