COVID-19 in India : कोरोनातून मिळाला थोडा आणखी दिलासा, 2.59 लाख नवीन केस आल्या समोर, 4209 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोनाची दुसरी लाट आता कमजोर होताना दिसत आहे. कोरोनाची प्रकरणे कमी होण्यास सुरूवात झाली असली तरी धोका अजूनही कमी झालेला नाही. कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांदरम्यान आता मृत्यूंचा आकडा भीती दाखवत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकड्यानुसार, देशात मागील 24 तासात कोरोनाची 2,59,551 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. तर 4209 रूग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाच्या नवीन प्रकरणांनंतर देशात एकुण संक्रमित रूग्णांची संख्या 2 कोटी 60 लाख 31 हजार 991 झाली आहे.

आरोग्य मंत्रालयानुसार, देशात आतापर्यंत कोरोनाने 30 लाख 27 हजार 925 अ‍ॅक्टिव्ह केस आहेत तर 2 कोटी 27 लाख 12 हजार 735 लोक बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत. देशात आतापर्यंत कोरोनाने 2 लाख 91 हजार 331 लोकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात सुद्धा कोरोनातून मोठा दिलासा मिळत असल्याचे दिसत आहे.

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस संसर्गाची 29,911 नवीन प्रकरणे आढळली आहेत आणि 738 लोकांचा मृत्यू झाला आहे. यानंतर गुरूवारी एकुण प्रकरणे 54,97,448 वर पोहचली आहेत तर 85,355 लोकांचा महामारीमुळे जीव गेला आहे. आरोग्य विभागानुसार, बुधवारच्या तुलनेत 4120 प्रकरणांची घट झाली आहे. मागील 24 तासात 47,371 रुग्णांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला, ज्यानंतर राज्यात संसर्गमुक्त होणार्‍या रूग्णांची संख्या वाढून 50,26,308 झाली आहे.

* मध्यप्रदेश – नवीन प्रकरणे 4,952, मृत्यू 88
* पश्चिम बंगाल – नवीन प्रकरणे 19,091, मृत्यू 162